चार महिन्यांत ठाकरे सरकारच्या सहा मंत्र्यांना सीबीआयचे निमंत्रण; किरीट सोमय्यांचा दावा

Kirit Somaiya - CM Uddhav Thackeray

मुंबई :- पुढील चार महिन्यांत ठाकरे सरकारचे सहा मंत्री सीबीआयच्या (CBI) दारात उभे असतील, असा दावा भाजपा (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) जाहीर आव्हान दिलं आहे. किरीट सोमय्या कल्याणमध्ये पाहणी दौऱ्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी खासगी आणि सरकारी कोविड रुग्णालयांची पाहणी केली. उपाययोजना न केल्यास १२ मेनंतर कोरोनाचे (Corona) मृत्यू प्रमाण वाढण्याची भीती यावेळी त्यांनी व्यक्त केली.

यावेळी किरीट सोमय्या म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि त्यांचं सरकार आता मोठ्या संकटात सापडले आहे. सीबीआयने रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांचा जबाब नोंदवला आहे. एफआयआरमध्ये परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या नावाचाही उल्लेख केला गेला आहे, म्हणूनच ठाकरे सरकारमधील सहा मंत्र्यांना लवकरच सीबीआयची निमंत्रण पत्रिका मिळणार आहे. परमबीर सिंग, रश्मी शुक्ला आणि सचिन वाझे यांच्यावर दबाब आणण्याचं काम ठाकरे सरकार करत आहे.

ही बातमी पण वाचा : परमबीर सिंग पुन्हा हायकोर्टात, ठाकरे सरकारविरोधात केला मोठा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button