तबलीगींच्या परदेशी फंड आणि रोख आर्थिक व्यवहारांची सीबीआयकडून प्राथमिक चौकशी सुरू

Tabligi - CBI

सीबीआयने तबलीगी जमातीच्या रोखीने व्यवहार करण्याच्या प्रकरणावरून आणि विदेशी फंड मिळवण्यासंदर्भातील माहिती लपविल्याप्रकरणी लबलिगी जमातचे आयोजक आणि या प्रकरणाशी संबंध अज्ञातांविरुद्ध प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.

देशातील कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. दररोज नवीन कोरोना विषाणूच्या रुग्णांची पुष्टी होत आहे. दरम्यान, सीबीआयने तबलीगी जमात संघटक आणि अन्य अज्ञात लोकांविरुद्ध प्राथमिक चौकशी (पीई) प्राथमिक चौकशी नोंदविली आहे.

वास्तविक सीबीआयला प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार तबलीगी जमातच्या आयोजक संस्थापकांनी अनाधिकृतपणे रोखीचे व्यवहात केलेत. तसेच, विदेशी फंडासंदर्भातही माहिती लपवल्याचा आरोप तबलीगींवर आहे. त्यामुळे साबीआयने तबलीगीं विरोधात प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.

कोरोना व्हायरसमुळे चर्चेत निजामुद्दीन भागात असलेल्या मर्कझविरोधात केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) अलीकडेच चौकशी सुरू केली. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने मर्कझशी संबंधित माहिती दिल्लीच्या गुन्हे शाखेकडे मागितली होती, जी आता त्यांना मिळाली आहे. दिल्लीतील कोरोना विषाणूच्या प्रसारासाठी कारणीभूुत ठरलेल्या मर्कझविरोधात दिल्ली पोलिसांनी यापूर्वीच चौकशी चालू केली आहे.

सूत्रांनी असेही सांगितले की, तबलीगी जमातने अधिका-यांपासून परकीय व्यवहाराची माहिती लपविली. परकीय योगदान नियमन कायद्याच्या (एफसीआरए) उल्लंघन केल्याबद्दल प्राप्त झालेल्या निधीची चौकशी करण्यासाठी आता सीबीआयकडून पीई नोंदविण्यात आले आहे. या वर्षाच्या एप्रिलमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जमादचे प्रमुख मौलाना साद, तबलीगी जमातशी निगडित विश्वस्त व इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (मनी लॉन्ड्रिंग) प्रकरणाविरोधात तक्रार दाखल केली होती.

ईडीने तबलीगी जमात आणि त्यांच्या अनाधिकृत व्वहारावर चौकशीचे काम सुरू केले आहे. बँका आणि वित्तीय मालमत्ता गोळा करणार्‍या एजन्सींकडून विविध कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे एजन्सीने हा खटला दाखल केला होता.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने तबलीगी जमात प्रकरणी परदेशी नागरिकांच्या नावावर १२ नवीन आरोपपत्र दाखल केल्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली. मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी तान्या बेमनीवाल यांच्याकडे १२,००० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यांनी पुढील सुनावणीसाठी 29 जूनची तारीख निश्चित केली.

आतापर्यंत गुन्हे शाखेने या प्रकरणात 900 हून अधिक परदेशी नागरिकांची नावे दिली आहेत. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीसी), महामारी रोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 अन्वये तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दलही त्यांच्यावर आरोप ठेवले गेले आहेत. त्यांच्यावर व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दलही दंड आकारला गेला आहे. सरकारने त्यांचा व्हिसा रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकले आहे.

हा खटला १13 मार्च रोजी दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीतील धार्मिक मंडळाशी संबंधित आहे ज्यात मोठ्या संख्येने परदेशी नागरिक सहभागी झाले होते. या संदर्भात दिल्ली पोलिसांनी 31 मार्च रोजी एफआयआर नोंदविला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER