सीबीआयने तृणमूलच्या नेत्यांना चौकशीसाठी घेतले ताब्यात; ममताही पोहोचल्या!

CBI arrests Trinamool leaders

कोलकाता :- ममतांचे सरकार स्थापन होताच, त्यांच्या मंत्र्यांविरोधात नारदा घोटाळ्याची पुन्हा चौकशी सुरू झाली. या घोटाळ्यातील आरोपी आणि ममतांचे कॅबिनेट मंत्री (Mamata’s cabinet minister) फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी आणि आमदार मदन मित्रांसह भाजपाचे माजी नेते सोवन चटर्जी (Sovan Chatterjee) यांच्या घरावर सीबीआयने (CBI) धाड टाकली. चारही नेत्यांना कार्यालयात नेले. हे समजताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील (Mamata Banerjee) सीबीआय कार्यालयात पोहचल्या !

तृणमूल काँग्रेसच्या चारही नेत्यांना सीबीआयने ताब्यात घेतल्याचे समजताच बंगालच्या राजकारणात भूकंप आला आहे. नेत्यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरु झाले आहे. सीबीआयचे अधिकारी ममतांच्या मंत्र्यांची चौकशी करत आहेत.

सीबीआयच्या टीमने सोमवारी सकाळी परिवाहन मंत्री आणि कोलकाता नगर पालिकेचे अध्यक्ष फिरहाद हकीम यांच्या घरावर धाड टाकली. हकीम यांना उचलले. मला नारदा घोटाळ्यात अटक केली जात असल्य़ाचे हकीम यांनी सांगितले. हकीम यांच्या समर्थकांनी त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यास सुरुवात केली.

सीबीआयच्या टीमने सुब्रत मुखर्जी आणि मदन मित्रा यांना देखील त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले. भाजपाचे माजी नेते सोवन चटर्जी यांच्या घरीदेखील सीबीआयने धाड टाकली. सोवन चटर्जी यांनी विधानसभा निवडणुकीआधी तृणमूलमधून भाजपात प्रवेश केला होता. मात्र, तिकिट न मिळाल्याने त्यांनी भाजपा सोडली होती.

सीबीआयने केले अटकेचे खंडन

या चारही नेत्यांना नारदा घोटाळ्यात चौकशीसाठी सीबीआय़ कार्यालयात आणण्यात आले आहे, प्रश्न विचारले जाणार आहेत. मात्र, त्यांना अटक केली नाही, असे सीबीआयने म्हटले आहे.या संदर्भात उल्लेखनीय आहे की, काही दिवसांपूर्वीच राज्यपाल जगदीप धनखड यांनी नारदा स्टिंग प्रकरणी फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा आणि सोवन चटर्जी यांच्याविरोधात खटला चालविण्यासाठी परवानगी दिली आहे. नारदा स्टिंगचा व्हिडीओ समोर आल्यावेळपासून हे नेते ममतांच्या सरकारमध्ये मंत्री होते. निवडणूक संपताच राज्यपालांनी या नेत्यांवरील कारवाईला मंजुरी दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button