टॅक्समॅन परत दार ठोठावणार; सीबीडीटी ने कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर सुरू केलेले प्रतिबंध काढले

CBDT tax

मुंबई: मार्च महिन्यात देशात कोरोना विषाणुचा (Corona Virus) प्रवेश झाला आणि संपुर्ण देश बंदीवासात गेला. कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक आर्थिक व्यवहारावर काही निर्बंध आणले होते. आता 9 महिने होत आहेत संपुर्ण जग कोरोनाच्या सावटाखाली जगत आहे. भारतातही आता जवळपास सगळ्याच क्षेत्रात शिथितलता आणून पुर्ववत केले आहे. तसेच आता लवकरच टॅक्समॅनही आपले दार ठोठावणार आहे.

लॉकडाऊनमुळे कर संकलनात घट झाल्याने आगामी काळात आयटी विभागाकडून अधिक सुचना मिळण्याची शक्यता आहे.

18 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) (CBDT) ने कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर लागू केलेले निर्बंध हटवले.

याबाबत वरिष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट दिलीप लखानी यांनी सांगितलेे की,”कर विभाग आय-टी कायद्याच्या कलम 148 अन्वये पुनर्मूल्यांकनाची तरतूद 6 वर्षांच्या आत करू शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER