सावधान ! कोरोना पुन्हा डोके वर काढतोय

Coronavirus

पुणे : राज्यात कोरोना (Corona) संसर्ग पुन्हा डोके वर काढत आहे. कोरोना प्रतिबंध म्हणून प्राथमिकदृष्ट्या संरक्षण म्हणून मास्क, सुरक्षित अंतर, रस्त्यावर थुंकू नये हे नियम करण्यात आले. संसर्ग मोठ्या प्रमाणात होता, तोपर्यंत अगदी काटेकोर अंमलबजावणी झाली. गेल्या महिन्यात लस आल्यानंतर मात्र जणू कोरोना गेलाच या आविर्भावात नागरिक बिनधास्त फिरत आहेत. नियम मोडणाऱ्या व्यक्तींकडून कोट्यवधी रुपये दंड वसूल केला आहे. दंड भरेन; पण नियम पाळणार नाही, अशा मानसिकतेमुळे संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. परिणामी, स्वतःसह इतरांच्या जीवाशी खेळणाऱ्या या नागरिकांना ‘आता, थांबा… पुन्हा कोरोनाला निमंत्रण देताय !’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

कोरोनामुळे संपूर्ण राज्याने अक्षरशः सर्वत्र स्मशान शांतता अनुभवली आहे. परंतु, लॉकडाऊननंतर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आले. आता तर सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. शाळा-कॉलेजही सुरू झाले आहेत. मात्र, तरुणांबरोबरच काही लोकांचे नको तेवढे धाडस वाढले आहे. नियम मोडले जात आहेत. राज्यभर शहराच्या विविध भागांत गर्दीच गर्दी असे चित्र नित्याचेच बनले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मास्क न वापरणे, सुरक्षित अंतर न पाळणे आदीबाबत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यभर सद्य:स्थितीत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. वाढत्या रुग्णांची संख्या विचारात घेता कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार मास्क न वापरणाऱ्या व्यक्ती तसेच दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट, मंगल कार्यालये, भाजी मार्केट या ठिकाणी मास्क न वापरणे, वाहन चालवताना चेहऱ्यावर अर्धवट मास्क लावणे व गर्दी करून सुरक्षित अंतराचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई केली जाणार आहे. नागरिक कोरोना गेला या भ्रमात मास्क आहेत. मात्र, दिवसेंदिवस कोल्हापूर शहरातही कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. परिणामी, नागरिकांनीच काळजी घेणे आवश्यक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER