नेत्ररोग कारणे व चिकित्सा – आयुर्वेदाच्या नजरेतून

Eye Problems-And Treatments

आजीवन डोळे (Eye) चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे. सुंदर डोळे आणि तीक्ष्ण नजर हे या ज्ञानेंद्रियाचे वैशिष्ट्य. म्हातारपणी सुद्धा सुईत दोरा अचूकपणे ओवणारे आजी आजोबा आपण बघतो तर अगदी २ – ३ वर्षा पासूनच चष्मा लावलेले मुलं आजूबाजूला दिसतात.

दृष्टीज्ञान योग्य प्रकारे होणे हे नेत्राचे कार्य. हे कार्य व्यवस्थित होण्याकरीता डोळ्यांची काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे. आयुर्वेदात नेत्र हे मातृज अवयव सांगितले आहे. गर्भावस्थेत आईने योग्य गर्भिणी परिचर्येचे पालन जन्मतः नेत्र चांगले असण्याकरीता आवश्यक आहे. गर्भावस्थेत अति आंबट तिखट पदार्थाचे सेवन, राग- शोक भावनांची अति प्रवृत्ती बाळाच्या नेत्रास घातक ठरते.

आयुर्वेदात (Ayurveda) या नाजूक अवयवांची काळजी कशी घ्यावी व कोणत्या कारणांनी नेत्ररोग होऊ शकतात त्यांची चिकित्सा काय करावी याचे वर्णन केले आहे. नेत्रात अग्नि (तेज) महाभूताची प्रधानता असते. म्हणूनच नेत्राची रक्षा करणे खूप गरजेचे आहे. नेत्र या ज्ञानेन्द्रियाचा हिन, मिथ्या, अति वापर दृष्टी क्षीण करणारे असते.

नेत्र रोग उत्पन्न होण्याची कारणे काय –

उष्णतेमुळे गरम शरीर झाल्यावर किंवा उष्ण हवामानात बाहेरून फिरून आल्यावर लगेच थंड पाण्यात पोहणे, स्नान करणे किंवा थंड पाण्याने चेहरा धुणे.

 1. दूरेक्षणात् – दूरच्या वस्तू निरंतर एकटक बघणे. डोळे बारीक करून बघावे लागल्याने डोळे खराब होतात.
  स्वप्न / निद्राविपर्यय – रात्रीची स्वाभाविक नैसर्गिक झोप न घेणे. म्हणजेच रात्री जागरण व दिवसा झोप घेणे.
  घाम डोळ्यात जाणे.
 • धूळ व धूर सतत डोळ्यात जाणे.
 • वांती येत असल्यास वांतीचावेग थांबविणे. अति प्रमाणात ओकारी पित्त पडणे.
 • रात्रीच्या वेळी तरल पदार्थ ( पातळ पदार्थ वा पाणी ) अति मात्रेत घेणे.
 • रात्री जड जेवण घेणे.

2. मल – मूत्र – अधोवायु यांचा वेग आला तरीही थांबविणे. हे आजकाल खूप मोठे कारण आहे. सू किंवा शी आली तरीही भीतीमुळे, योग्य जागा नसेल तर अडकविण्याची प्रवृत्ती असते.

 • सतत किंवा लवकर रडू येणे राग येणे शोक करणे. यामुळे डोळ्यावर ताण येतो. डोळे लाल होतात.
  डोक्याला मार बसणे.
 • अतिमद्यपान, धूम्रपान – विशेषकरून नाकातून धूर काढल्याने.
 • मानसिक आघात, उद्विग्नता क्लेश होणे.
 • आंबट पदार्थाचे अति व सतत सेवन.
 • अश्रु येत असतील तर जबरदस्तीने अश्रु अडकविणे.
 • अति सूक्ष्म वस्तू एकटक बघणे. हाताने बारीक शिलाई काम किंवा सुई ओवणे असे काम सतत करणे.
 • उघड्या डोळ्यांनी तीव्र सूर्याकडे बघणे. ग्रहण बघणे.

अशी अनेक कारणे नेत्ररोगाकरीता सांगितली आहेत. त्या काळात आयुर्वेदाने सांगितलेली ही कारणे आजही आढळतात. एकटक प्रखर प्रकाशाकडे बघणे हे दृष्टी करीता घातक सांगितले आहे. आजकाल टिव्ही मोबाईल लॅपटॉप याच्या प्रखर प्रकाश घातक परीणाम दिसून येतो. उन्हात फिरतांना किंवा बाहेरून आल्यावर थंडा थंडा कूल कूल म्हणत डोक्यावर थंड पाणी टाकणे नेत्राला घातकर आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. धूळ धूर यांच्याशी संपर्क वाढलाय ते देखील नेत्ररोगाचे मोठे कारण आहेच.
क्रमशः

ayurveda

 

 

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER