सांगली येथे मोबाईल चोरुन पळणार्‍या चोरट्याला रंगेहाथ पकडले

caught mobile thief in Sangli

सांगली : बंगल्याचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून मोबाईल चोरुन बाल्कनीतून उडी मारुन पसार होण्याच्या प्रयत्नात असलेला चोरटा हाती लागला आहे. चोरलेल्या मोबाईलसह विश्रामबाग पोलीसांनी अनिल तुकाराम टोणे (वय 28, रा. हनुमान नगर) याला अटक केली आहे.

सांगलीतील तरुणाला बेदम मारहाण करणार्‍या चौघांना अटक

धामणी रोडवरील कंठे मळा परिसरातील शांतीसागर कॉलनीत श्रीकांत शशिकांत पुरमवार यांचा द्वारका नावाचा बंगला आहे. पुरमवार यांचा खतविक्रीचा व्यवसाय आहे. मंगळवारी सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बंगल्याचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून संशयीत अनिल टोणे हा चोरपावलांनी बंगल्यात शिरला. समोरच्या टेबलवर असलेला पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल उचलून तो बाल्कनीकडे धावला. तो बाल्कनीतून उडी मारुन पलायन करण्याच्या प्रयत्नात असतानाच श्रीकांत पुरमवार यांनी धाडसाने पुढे होऊन चोरट्याला पकडले. हा प्रकार विश्रामबाग पोलीसांना सांगितला. त्यानंतर अनिल टोणे याने चोरलेल्या पाच हजाराच्या मोबाईलसह त्याला विश्रामबाग पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. घरांचा, फ्लॅट आणि बंगल्याचे दरवाजे अर्धवट उघडे असल्याचे आणि समोरच्या हॉलमध्ये कोणी नसल्याचे हेरुन मौल्यवान ऐवज, मोबाईल, रोकड चोरुन नेण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. आता चोरटा हाती लागल्याने त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.