जनसंघर्ष टाळण्यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक – नाना पटोले

Nana Patole

भंडारा :- जनसंघर्ष टाळण्यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे. जनगणना योग्य पद्धतीने होत नसल्याने आरक्षणासारखा मुद्दा गंभीर होत असून जाती-जातीमधील संघर्ष शिगेला जाताना दिसत आहे. तसेच जातीनिहाय जनगणना आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यासाठी सहकार्य मिळत आहे. हा प्रस्ताव विधानसभेच्या पटलावर घेतला आणि विधानसभेला ते म्हणणे पटवून दिले, असे मत विधानसभेचे सभापती नाना पटोले यांनी व्यक्त केले.

नाना पटोले (Nana Patole) गेल्या दोन दिवसांपासून सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. जातीपातीतील संघर्ष टाळण्यासाठी कुणी तरी पुढाकार घेणे आवश्यक आहे. याआधी १९३२ साली जातीनिहाय जनगणना करण्यात आली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, लोकशाही व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न करत माझे अधिकार लोकांसाठी वापरून त्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राज्यामध्ये कोणकोणते उपक्रम राबवू शकतात, हे दाखवण्याची संधी मला सभागृहाने दिली आहे. कोरोना प्रादुर्भाव नसता तर राज्यभरात जाण्याचे माझे नियोजन तयार केले होते, असेही ते म्हणाले. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन राज्य व देशाच्या विकासातील काँग्रेसचे योगदान लोकांपर्यंत पोहचवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER