जातींवर आधारित आरक्षण आणि अट्रोसिटी कायदा रद्द करा

राष्ट्रीय मराठा समाज पार्टीची मागणी

Caste based reservations and cancellation of Atrocity Act

लातूर :- देशात जातींवर आधारित असलेले आरक्षण रद्द करून आर्थिक निकषावर आरक्षण लागू करा आणि अट्रोसिटी कायद्याचा दुरुपयोग होत असल्यामुळे हा कायदा रद्द करा, अशी मागणी राष्ट्रीय मराठा समाज पार्टीने केली आहे.

आमचा पक्ष फक्त ही मागणी करतच नाही तर याच मुद्यांवर आम्ही विधानसभेच्या २८८ जागा लढविणार आहोत, अशी घोषणा पार्टीचे अध्यक्ष अंकुश पाटील यांनी लातूरमध्ये पत्रकार परिषदेत केली.

ते पुढे म्हणाले की, राज्यात मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढूनही सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसत, न टिकणारे आरक्षण दिले. त्यामुळेच जातींवरील आरक्षण सरसकट रद्द करून आर्थिक निकषावरचेच आरक्षणच देशहिताचे राहील.

हि बातमी पण वाचा : सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश लेखी गुणांच्या आधारे व्हावेत; मुख्याध्यापक व पालकांची सूचना

अट्रोसिटी कायद्याचा सातत्याने दुरूपयोग केला जात असल्यामुळे हा कायदाच रद्द करा, अशी मागणीही अंकुश पाटील यांनी केली.

या दोन प्रमुख मुद्यांवरच आमचा पक्ष आगामी विधानसभा लढविणार आहे, असे पाटील म्हणाले.

Caste based reservations and cancellation of Atrocity Act2