रत्नागिरीत मटका धंद्यावर धाड, ५ जणांवर गुन्हा दाखल

arrested

रत्नागिरी( प्रतिनिधी) : रत्नागिरी पोलिसांनी अवैध धंद्याविरोधात धाडसत्र सुरू केले असून शहराच्या मारुती मंदिर परिसरातील करमरकर रुग्णालयाजवळील गल्लीत चालू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल व इतर जुगाराचे साहित्य असा एकूण ६,१२० रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी ५ संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.

मटका जुगार चालविणारा सागर दत्ताराम चव्हाण (३०, रा. कोकणनगर, रत्नागिरी), मटका जुगार खेळणारे अनिल धोंडू मटकर (५०, रा. केळ्ये आंबेकोंड, मजगाव), राजेंद्र जगन्नाथ पाटील (४०, रा. उद्यमनगर), सुरेश शिवा माईन (६०, रा. ६७६, दामले हायस्कूलजवळ, रत्नागिरी), भिमाप्पा बसाप्पा टाळीगिरी (३०, रा. मेमन हॉलचे शेजारी, उद्यमनगर, रत्नागिरी) यांचा गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये समावेश आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी मुंबई जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.