कोल्हापूर : कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूसाठी मुख्यसचिवांविरुद्व दाखल होणार गुन्हा

- शहर व जिल्हा नागरी कृती समितीने दिला इशारा

कोल्हापूर : यापुढे कोल्हापूरमध्ये कोरोनामुळे (Corona virus) नागरिकांच्या मृत्यूसाठी राज्याचे मुख्यसचिव संजय कुमार (Sanjay Kumar) यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने दिला आहे.

याबाबत मुख्यमंत्रयांना समितीने पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटले आहे की – कोरोना उपचार केंद्र उभारण्यासाठी कोर्टाची जुनी इमारत ताब्यात घेण्यास किवा तिचा कोणत्याही प्रकारे उपयोग न करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असे संजय कुमार यांनी कळवले आहे. याच्या निषेधात कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे.

कोल्हापूरकरांनी आज पंचगंगा नदीत (Panchganga River) संजय कुमार यांची प्रतिमा सोडून निषेध केला. तसेच संजय कुमार यांनी दिलेल्या आदेशाची प्रत नदीत बुडवली. कार्यकर्त्यांनी शासन आणि संजयकुमार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सर्वपक्षीय कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, दिलीप देसाई, अंजुम देसाई, संभाजी जगदाळे, बाबा देवकर, सुभाष देसाई, विनोद डूणूंग आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER