अजित पवारांच्या सभेला गर्दी, नियमांचे उल्लंघन; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Maharashtra Today

पंढरपूर :- राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी काल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभा घेतली. या सभेदरम्यान प्रमाणापेक्षा जास्त गर्दी जमली होती. यामुळे कोरोना नियमांचा भंग झाला होता (Corona-rules-violation-in-pandharpur-ajit-pawar-campaign). या प्रकरणी आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजित पवारांचा हा मेळावा श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केला होता. यामुळे त्यांच्यावर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १८८ नुसार पंढरपूर शहर पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकी रणधुमाळी आता शिगेला पोहचली आहे.

पंढरपूर तालुक्यातील गादेगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या प्रचारासाठी काल (८ एप्रिल) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेतली. यावेळी मोठ्या संख्येनं पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पंढरपुरात अजित पवारांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याण काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रवेश कार्यक्रमाला फक्त २०० लोकांची परवानगी होती. मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. यातील अनेक जण मास्क न घातलेले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button