शबाना आझमी यांच्या कारचालकावर गुन्हा दाखल

मुंबई :- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारचा अपघात झाला. या अपघातात शबाना आझमी जखमी झाल्या असून त्यांना प्राथमिक उपचारांसाठी पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात हलवण्यात आले.

ही बातमी पण वाचा : अभिनेत्री शबाना आझमींच्या अपघातानंतर पंतप्रधान मोदींनी केले ट्वीट

आझमी यांच्या कार अपघातप्रकरणी त्यांच्या वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव वेगाने कार चालवल्याप्रकरणी चालक अमलेश कामतवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक चालक राजेश शिंदेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हा गुन्हा नोंदविला आहे.

माहितीनुसार, एक्स्प्रेस वेवर एका ट्रकला मागून शबाना आझमी यांची कार धडकली आणि हा अपघात घडला. कारमध्ये चालक, शबाना आझमी यांच्यासोबत जावेद अख्तरसुद्धा होते. कारचा चालकसुद्धा जखमी झाला आहे. तर जावेद अख्तर यांना कोणतीही दुखापत झाली नाही.