येस बँकेला २०० कोटींनी ठगणाऱ्या सारंग आणि राकेश वाधवानविरुद्ध गुन्हा दाखल

Sarang and Rakesh Wadhwan

मुंबई : येस बँकेला २०० कोटींनी ठगणाऱ्या सारंग आणि राकेश वाधवानविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. एचडीआयएलचे प्रमोटर्स सारंग आणि राकेश वाधवान यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयने मुंबईतल्या वाधवान यांच्या दहा ठिकाणी ‘सर्च ऑपरेशन’ केले. यामध्ये एचडीआयएलच्या दोन ऑफिसेसचाही समावेश आहे. येस बँकेने ‘मॅक स्टार’ला लोन दिले होते मॅक स्टार ही एचडीआयएलची अल्प समभागधारक कंपनी आहे. सारंग वाधवान यांनी हे आरोप फेटाळल्याचे कळते, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER