शरद पवारांच्या आधीच पुतळ्याचे अनावरण करणे भोवले , गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल

मुंबई : गनिमी काव्याने जेजुरीतील अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar) यांच्या पुतळ्याचं अनावरण करणं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना चांगले महागात पडले . भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच पोलीस कामात अडथळा आणण्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आज पहाटेच जेजुरी गडावरील अहिल्याबाईंच्या पुतळ्यांचं उद्घाटन करण्यात आलेलं असून, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन करवून घेतलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन उद्या होणार होते, मात्र त्या आधीच शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं उद्घाटन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी मेंढपाळांच्या हस्ते केलंय. गेल्या काही दिवसांपूर्वीच हा पुतळा उभा करण्यात आला होता. जेजुरी गडावरील अहिल्याबाईंचा पुतळा वर्षभरापूर्वीच तयार झाला होता. पण कोरोनाचा काळ असल्याने त्याचे उद्घाटन रखडले होते . शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार होते.

शासकीय कामात अडथळा आणणे, जमावबंदीचे उल्लंघन करणे आणि पोलिसांशी झटापट केल्याप्रकरणी पडळकर यांच्यासह कार्यकर्त्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जेजुरीचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER