सरकारी कामात अडथळा : इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल

Imtiaz Jalil

औरंगाबाद :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक जिल्ह्यांत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र, काहीशी परिस्थिती आटोक्यात आली असताना काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. औरंगाबादमध्ये दुकाने उघडणारच, अशी घोषणाबाजी करणारे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांना कामगार आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.

१ जूनपासून औरंगाबाद शहरातील दुकाने उघडणारच… अशी घोषणाबाजी करत खासदार जलील यांनी प्रशासनाला आव्हान दिले होते. कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई केली होती. राज क्लॉथ या दुकानावर ही कारवाई करत सील केले. मात्र, या कारवाईमुळे जलील संतापले आणि आयुक्तांचे कार्यालय गाठले. कारवाई का केली, असे विचारले. ‘लॉकडाऊनमुळे आधीच लोकांचे रोजगार बुडाले आहेत. दुकानात हातावर पोट असणारे काम करतात. ‘तुला काही वाटत कसं नाही?’ अशा भाषेत जलील यांनी कामगार आयुक्तांशी बाचाबाची केली होती.

५० हजारांचा दंड का ठोठावण्यात आला, असा आरोप जलील यांनी केला होता. मात्र, असा कोणताही दंड स्वीकारला नाही, असा दावा कामगार आयुक्त यांनी या व्हिडीओत केला आहे. अखेर, कामगार आयुक्तांनी जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप जलील यांच्यावर करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button