कोल्हापुरात डीवायएसपीवर गुन्हा दाखल

DYSP Angad Jadhav

कोल्हापूर : गडहिंग्लजचे डीवायएसपी अंगद जाधवर(DYSP Angad Jadhav) यांच्यासहित अन्य चार जणांवर चंदगड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडप केल्याप्रकरणी गडहिंग्लज विभागाचे डीवायएसपी अंगद जाधवर यांच्यासहित 4 जणांवर ठपका आहे. भा.द.वी कलम 420, 464,468,471,447,427, 506 या कलमांतर्गत ही कारवाई केली आहे.

हंबीरे गावातल्या एका व्यक्तीने खरेदी केलेल्या जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून त्याला धमकी देऊन जमीन हडपल्याचा आरोप आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रकरणात या अधिकाऱ्याचे नाव घेतले जात होते अखेर आज त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.

गुन्ह्यातील नावे कमी करण्याच्या प्रकरणात सुद्धा डीवायएसपी यांच्या नावाची चर्चा आहे. चंदगड पोलीस ठाण्यात गणेश फाटकवर आतापर्यंत फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल झालेत ज्यात आता डीवायएसपीचे नाव आल्याने खळबळ माजली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER