या जन्मी केलेले याच जन्मी भोगायचे आहे, परमेश्वर सर्वांचाच हिशेब करतो : चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला

Anil Deshmukh - Chandrakant Patil

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी केलेल्या 100 कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी सीबीआयने (CBI)अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे . राष्ट्रवादी काँग्रेसनं या कारवाईच्या मागे भाजप असल्याचा आरोप केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या आरोपांना प्रतिउत्तर दिले आहे . ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने शेवटी एफआयआर दाखल केलाच. मुंबई नागपूर घरासह दहा ठिकाणी छापे घालून तपासणी सुरू आहे. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सीबीआय कायदेशीर कारवाई करत आहे. यातून जे निष्पन्न होईल, त्यानुसार कारवाई होईल,’ असं पाटील म्हणाले. हसन मुश्रीफ यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारलं असता, ‘कुठल्याही विषयावर भाष्य करण्याची हसन मुश्रीफांना घाई असते. हायकोर्टाच्या निर्देशांनुसार होणाऱ्या सीबीआय कारवाईमध्ये भाजपचा कट कसा?’, असा प्रश्न त्यांनी केला.

‘आज काही सुपात आहेत, काही जात्यात आहेत. परमेश्वर सर्वांचाच हिशेब पूर्ण करतो. या जन्मी केलेले याच जन्मी भोगायचे आहे,’ अशी टीकाही पाटील यांनी केली . एनआयएच्या कोठडीत असलेल्या सचिन वाझे यांनी अनिल परब आणि घोडावत यांच्यावरही आरोप केले आहेत. त्यांचीही सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी पाटील यांनी केली.

ही बातमी पण वाचा : रोजच सकाळी संजय राऊतांचे नाटक, केंद्रीय महिला आयोगाने त्यांची चौकशी करावी – चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button