जगातील सर्वात महान एसयुव्ही कार.. कार्लमान किंग !

Carlman King greatest SUV car in the world

१९व्या शतकाच्या सुरुवातीचा काळ. जेव्हा जगभरातले लोक घोडागाडीनं प्रवास करायचे. तेव्हा लोकांनी अनेक प्रकारच्या घोडागाड्या बनवून घेतल्या होत्या. नंतर काळ बदलला. जर्मन डिझायनर, आणि ऑटोमोबाईल इंजिनिअर कार्ल बेंडने जगातली पहिली मोटरगाडी बनवली. वर्ष होतं १८५५. आता थेट १३६ वर्ष पुढं येऊ २०२१ मध्ये. आज मोटर गाड्यांची काहीच कमी नाही. जगभरात रॉयल,क्लासिक गाड्या भरपूर आल्यात ज्यांची किंमत करोडोंच्या घरात जाते. यातच जगातली सर्वात महाग एसयूव्ही म्हणून कार्लमान किंग ओळखली जाते.

वाळवंटातही देते आराम

डायमंड कट्सच्या थीमवर बनवलेली आणि फायटर प्लेन सारखी  दिसणारी कार्लमान किंग एसयुव्ही आर्मीच्या वापरासाठी बनवलेली आहे. १५ कोटी रुपयांच्या  पुढे हीची विक्री होते. यामध्ये दोन मॉडेल्स येतात. त्यातलं एक बुलेटप्रुफ मॉडेल आहे. किंमत जिकती जास्त आहे तितकाच या एसयुव्हीचा कम्फर्टदेखील. ४० डिग्रीपासून २० ० डीग्री पर्यंतचे तापमान कार्लमान किंग सहन करु शकते. स्टील आणि कार्बनपासून बनवलेलं एक्सटीरियर आवरण मॅट ब्लॅक कलरचे आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की एक कार्लमान किंग गाडी बनवायला ३० हजार तास लागतात.

जगभरात या कारला फक्त १२ लोकांनी खरेदी केलंय. कारण कंपनीने आतापर्यंत फक्त  १२ कार्लमान किंग बनवल्यात.

४.५ टन वजन असणाऱ्या कार्लमान किंगचं इंजिन फोर्डच्या एफ- ५५० प्लॅटफोर्मवर विकसीत करण्यात आलंय. ४०० हॉर्स पवारचं व्हि -८ वालं दमदार इंजिन असून जगप्रसिद्ध हॅमर कारपेक्षाही हे जास्त ताकदवर आहे. याला ६ स्पीड ऑटोमॅटीक गेअर बॉक्स देण्यात आलाय.

फोर्डच एफ-५५० इंजिन फोर्डच्या एफ सिरीजच्या सुपर ड्यूटी ट्रकांमध्ये वापरण्यात येतं. दमदार इंजिन असेलेल्या या कारचं टॉपस्पीड १४० किलोमीटर प्रतितास आहे.

१५ कोटी रुपये आहे किंमत

२० लाख युएस डॉलर्सच्या या कारची किंमत भारतात १५ कोटींच्या घरात जाते. चिनच्या बिजींग आणि शांघाई भागातील अतिश्रीमंत लोक ही कार वापरतात.  चीनमध्ये या कारची किंमत १२ मिलियन युआन आहे.

चिनी कंपनीने केलिये डिझाईन

स्टील्थ फायटर सारखा लुक असणारी कार्लमान किंगचे डिझाईन चीनची ऑटोमोटीव्ह फर्म ‘आयएटी ऑटोमोबाइल टेक्नोलॉजीने १८०० सर्वोत्कृष्ठ डिझाईन एकत्र करुन बनवले आहे. युरोपात ही गाडी तयार करण्यात येते.

इंटेरि्अर आहे सर्वात खास

गोल्डन पॅनल, डार्कवूड, अलंकतारा फॅब्रिकपासून बनलेलं इंटेरिअर प्रचंड आकर्षक आणि प्रभावशाली दिसतं. रोल्स रॉयल्सच्या तोडीस तोड इंटेरिअर या गोडीसोबत मिळतं. हाय- फाय साउंड सिस्टीम, अल्ट्र एचडी ४ के टीव्ही, प्रायव्हेट सेफ बॉक्स आणि फोन प्रोजेक्शन सिस्टीम या टिव्हीसोबत येतो.  यासोबतच कार्लनाम किंगच्या आत सॅटेलाइट टिव्ही किंवा फ्रिज, सॅटेलाइट फोन, कॉफी मशिन, टेबल एसी, इनडो्अर नियॉन लाइट, बसवण्यात आलेत. या कारचे सर्व फिचर मोबाईलद्वारे  नियंत्रित केले जाऊ शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER