‘मोदी सरकार’ असा उल्लेख न करण्याचा आदेश देऊ शकत नाही

Karnataka High Court - PM Narendra Modi
  • कर्नाटक हायकोर्टाचे याचिकाकर्त्यास उत्तर

बंगळुरु : केंद्रातील सरकारचा ‘मोदी सरकार’ (Modi Government) आणि राज्यातील सरकारचा उल्लेख राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने  करू नका, असा सक्तीचा आदेश आम्ही माध्यमांना देऊ शकत नाही, असे सांगून कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) यासाठी एका शेतकºयाने केली जनहित याचिका निकाली काढली आहे.

ए. मल्लिकार्जून नवाच्या शेतकºयाने ही याचिका केली होती. माध्यमांमध्ये, केंद्र सरकारचे पत्रसूचना कार्यालय आणि अन्य मंत्रालयांतर्फे प्रसिद्धीस दिल्या जाणाºया पत्रकांमध्ये व मंत्र्यांच्या पत्रकार परिषदांमध्येही केंद्रातील सरकारचा ‘मोदी सरकार’ व कर्नाटकमधील सरकारचा ‘बीएसवाय सरकार’ असा उल्लेख केला जाण्यास त्यांचा आक्षेप होता.

याचिका निकाली काढताना मुख्य न्यायाधीश न्या. अभय श्रीनिवास ओक व न्या. शंकर मगदूम यांच्या खंडपीठाने म्हटले की, माध्यमांना तर आम्ही असा आदेश देऊ शकत नाही. परंतु ‘पीआयबी’ व अन्य केंद्रीय मंत्रालयांच्या संदर्भात याचिकाकर्त्यास आपले गाºहाणे सरकारकडे मांडायचे असेल तर त्यांनी तसे निवेदन द्यावे व त्यावर सरकारने कायद्यानुसार काय तो निर्णय घ्यावा.

ही याचिाका करण्यामागची मल्लिकार्जून यांची तात्विक बैठक तर्कसंगत व बिनतोड होती. त्यांचे म्हणणे होते की, भारताचे संविधान हे लोकांनीच तयार करून लोकांच्या स्वाधीन केले संविधान आहे.  तसेच या संविधानानुसार केंद्र आणि राज्यात स्थापन होणारी सरकारे हीसुद्धा जनतेचीच सरकार असतात. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जनतेचे प्रतिनिधी म्हणून त्या खुर्चीत बसत असतात. त्यामुळे हे ‘माझे’ सरकार आहे असे ते म्हणू शकत नाहीत किंवा लोकही त्या सरकारांचा उल्लेख पदावरील व्यक्तीच्या नावेने करू शकत नाहीत.

याचिकाकर्त्याचे हे प्रतिपादन बरोबर की चूक यावर न्यायालयाने कोणतेही भाष्य केले नाही. फक्त आपल्या अधिकारांच्या मर्यादा लक्षात घेऊन माध्यमांना व सरकारला आदेश देण्यास असमर्थता दर्शविली. ही याचिका करून मल्लिकार्जून यांच्या हाती ठोस असे काहीच लागले नसले तरी त्यांनी हा विषय या निमित्ताने सार्वजनिक चर्चेत आणला हेही महत्वाचे आहे. शिवाय एका सामान्य शेतकºयाची संविधान व त्यातील मूल्यांवरील दिसून आलेली निष्ठाही कौतुकास्पद  आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER