लसींच्या किमतीबाबत सुनावणी नाही; हायकोर्टाने याचिका फेटाळली

Coronavirus Vaccine - Bombay High Court - Maharashtra Today
Coronavirus Vaccine - Bombay High Court - Maharashtra Today

मुंबई : लसींच्या किमतीसंदर्भात दाखल याचिकेवर सुनावणी करण्यास मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) स्पष्टपणे नकार दिला आहे. देशभरातील नागरिकांना कोरोना (Corona) प्रतिबंधक लस (Vaccine) प्रतिडोस १५० च्या समान दराने पुरविली जावी यासाठी हायकोर्टाने आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने असा कोणताही आदेश देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली.

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी यावेळी याचिकाकर्त्याला सुप्रीम कोर्टात जाण्याचा सल्ला दिला. सुप्रीम कोर्टाने आधीच देशभरासाठी महत्त्वाचे असणारे मुद्दे आम्ही ग्राह्य धरू असं स्पष्ट केलं आहे. लसींच्या किमती संपूर्ण भारतभर लागू होतात, तो देशभराचा विषय आहे, असं यावेळी त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, तुम्ही याचिका दाखल करण्याआधीच सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आहे. तुम्ही त्यांच्याकडे दाद मागू शकता. तुम्ही या संदर्भात वारंवार याचिका दाखल करू शकत नाही. आम्हाला परिस्थितीची जाणीव आहे आणि लोकांना चांगले उपचार मिळावेत यासाठी सतत केंद्र आणि राज्य सरकारला सांगत आहोत, असं यावेळी न्यायालयाने सांगितलं.

देशात सध्या लसीकरण मोहीम सुरू असून १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण सुरू होणार आहे. राज्यात मात्र लसीकरणास सुरुवात होणार नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितलं. लसीचे डोस उपलब्ध होण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे नाइलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button