दसर्‍याला पंतप्रधानांचा पुतळा जाळल्याप्रकरणी भाजपाने व्यक्त केला निषेध

Tarun Chugh

नवी दिल्ली : भाजपचे (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांनी सोमवारी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पुतळ्याचे दहन करण्याच्या निषेध केला. चुग यांनी याला दुर्दैवी म्हटले आहे. तसेच अशा घटनांनी देशातील कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. राज्यात कॉंग्रेसप्रणीत सरकारच्या आदेशानुसार पंतप्रधानांचा पुतळा जाळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की यातूनच सत्ताधारी पक्ष “क्षुल्लक राजकारणा” पर्यंत कसा खालच्या पातळीवर जाऊ शकतो हे दिसून येते.

हे खपवून घेतले जाऊ शकत नाही, असे म्हणत चुग यांनी असा दावा केला की राज्यातील अमरिंदर सिंग यांचे सरकार कॉंग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना “खुश” करण्यासाठी अशा कृतीतून तणाव निर्माण करू इच्छित आहे. . त्याच बरोबर, चुघ यांनी पंजाबचे राज्यपाल व्ही. पी. सिंह बदनोरे यांना पत्र लिहून पुतळा जळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER