देशात पुन्हा ‘१९८४’ होऊ देणार नाही : दिल्ली उच्च न्यायालय

Delhi High Court

नवी दिल्लीः आमच्या डोळ्यांदेखत आम्ही देशात ‘१९८४’ पुन्हा होऊ देणार नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (सीएए) ईशान्य दिल्लीत हिंसाचार उफाळला. या हिंसाचारात २० जणांचा बळी गेला आहे. अनेक जण जखमी असून, रुग्णालयात आहेत. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, त्यावर आज बुधवारी सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने कडकपणे हा इशारा दिला.

दिल्लीत ‘१९८४’मध्ये वांशिक हिंसाचार उफाळून, शेकडोंना प्राण गमवावे लागले होते, हे येथे उल्लेखनीय.

डोवाल यांनी हिंदू-मुस्लिम वस्त्यांमध्ये साधला संवाद

दरम्यान, माकपा नेत्या वृंदा करात यांनी भाजपा नेते अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी तक्रार केली आहे. २८ फेब्रुवारीला यावर निर्णय होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.