कंगनाचा बंगला तोडलेल्या अवस्थेत ठेवू शकत नाही, हाय कोर्टाने महापालिकेला फटकारले

Kangana Ranaut - BMC - Bombay High Court

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौतच्या (Kangana Ranaut) कार्यालय तोडफोड प्रकरणाचा खटला मुंबईउच्च न्यायालयात (Bombay High Court) सुरू आहे. हाय कोर्टाने मुंबईतील इमारत दुर्घटनेवरुन मुंबई महापालिकेला (BMC) चांगलेच फटकारले आहे. कंगनाप्रकरणी उत्तर देण्यासाठी बीएमसीच्या वकिलांनी २ दिवसांचा कालावधी मागितला होता. त्यामुळे, न्यायाधीश कठावडा भडकले, एखाद्याचं घर तोडण्यात आलंय. मग, पावसाळ्याच्या वातावरणात त्या घराला असंच पडीक ठेवता येणार नाही, असे न्यायाधीशांनी म्हटले.

या प्रकरणी कंंगनाने दाखल केलेल्या याचिकेनंतर शिवसेना (Shiv Sena) खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) तसंच महापालिकेचे अधिकारी भाग्यवंत लोटे या दोघांनाही प्रतिवादी करण्यात आलं आहे. या प्रकरणावर आज सुनावणी सुरु असतान या दोघांनीही उत्तर देण्यासाठी मुदतवाढ मागितली. ज्यानंतर हायकोर्टाने या दोघांना मुदतवाढ दिली आहे. मात्र तो बंगला तोडलेल्या अवस्थेत सोडू शकत नाही असंही म्हटलं आहे.

गुरुवारी न्यायमूर्ती एस. जे. कठावला आणि न्यायमूर्ती आर. चगला यांच्या खंडपीठाला राऊत यांचे वकील प्रदीप थोरात यांनी सांगितलं की, त्यांना कोर्टाची नोटीस गुरूवारी सकाळी मिळाली आहे. त्यामुळे यावर उत्तर देण्यासाठी थोडा अवधी देण्यात यावा अशी विनंती कोर्टाकडे करण्यात आली. तर दुसरूकडे पालिका अधिकारी भाग्यवंत लोटे यांनीही उत्तर देण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागून घेतला. दोघांनाही पुढील आठवड्यात मंगळवारपर्यंत आपलं उत्तर सादर करण्यासाठी कोर्टानं मुदतवाढ दिली आहे. मात्र कारावाई करताना पालिका तत्पर होती, मात्र आम्ही काही विचारलं तर तुम्हाला वेळ हवाय असा टोला न्यायमूर्ती काथावाला यांनी लगावला.

याचिकाकर्त्याचा बंगला ४० टक्के तोडण्यात आला आहे. साध्य पावसाळा सुरु असून या बंगल्याला अश्या अवस्थेत सोडता येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर सुनावली घेणे गरजेचे आहे. असेही कोर्टाने नमूद केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER