दसरा चौकात कँडल मार्च : उत्तर प्रदेश सरकारचा निषेध

Kolhapur Candle March-Hathras Hang Rape

कोल्हापूर :  उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras Gang Rape) येथील महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी फुले शाहू आंबेडकर विचार संवर्धक समितीने केली. बुधवारी दसरा चौकात कँडल मार्च (Candle march ) करत उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला. अमानवीय अत्याचाराच्या निषेधार्थ कोल्हापूर येथील पुरोगामी समतावादी सामाजिक संघटनांच्या वतीने दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर मेणबत्ती प्रज्वलीत करून आदरांजली वाहिली.

हाथरसची घटना मानवतेला कलंकित करणारी व महिलांच्यामध्ये दहशत निर्माण करणारी असल्याने भितीचे वातावरण आहे. बलात्काराच्या घटना वाढल्या असून उत्तर प्रदेशामध्ये (UP)कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण झाली आहे. दोषी आरोपींना फासी द्या, कुटूंबियांना संरक्षण द्या. बलात्काराच्या घटनांचे प्रमाण कमी करण्यासाठी कठोर कायदा करा, उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, आदी मागण्या केल्या. यावेळी दिगंबर लोहार, शहाजी कांबळे, इंद्रजीत कांबळे, प्रेमानंद मौर्य मदन कडाळे, आर.एस.कांबळे, संभाजी कांबळे, विजय मोरे, जे. के. कांबळे, सुनिलकुमार कांबळे,
बाळासाहेब भोसले, सागर कांबळे, रघुनाथ मांडरे, आदी उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : सातारा पोलीस अधीक्षकाची बदली : शंभुराज देसाईंच्या हट्टामुळेच बदलीची चर्चा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER