PSI परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवणार; गृहमंत्र्यांचा मोठा निर्णय

Dilip Walse Patil - Maharastra Today

मुंबई : राज्यात २०१७ आणि २०१८ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षामध्ये पात्र ७३७ उमेदवारांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी मोठा दिलासा दिला आहे. यांना जून २०२१ मध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण कोरोनाच्या अटी तसेच राज्य सरकारने जारी केलेल्या कोरोना मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून केले जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

उमेदवारांना दिलासा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक भरतीमध्ये निवड झालेल्या आणि २०१७ मध्ये खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षामधील एकूण ७३७ उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवले जाणार आहे. या उमेदवाराचे प्रशिक्षण जून महिन्यापासून सुरू होईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे निवड झालेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

SRPF जवानांना मोठा दिलासा
SRPF जवानांच्या प्रश्नांबाबत आज मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीकरिता आवश्यक सेवेची अट १५ वर्षांवरून १२ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बदलीनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्तव्य कालावधी ५ वर्षांवरून २ वर्षांवर करण्याचा निर्णय घेतला. SRPF जवानांसाठी घेतलेल्या या दिलासादायक निर्णयाबद्दल आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button