SEBC प्रवर्गातील उमेदवारांना EWS मधून सहभागी होता येणार; खासदार संभाजीराजेंचे ऊर्जामंत्र्यांना पत्र

Shmbhaji Raje - Nitin Raut

मुंबई :- मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून रखडलेल्या ऊर्जा विभागातील भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार आहे. आता SEBC प्रवर्गातील उमेदवारांना EWS प्रवर्गातून भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. हे परिपत्रक ऊर्जा विभागाने काढले आहे. SEBC प्रवर्गातील उमेदवारांना वगळून भरती केली जाणार होती. याला मराठा समाजाने तीव्र विरोध केला आहे. ऊर्जा विभागातील अभियंता पदासाठी तीन जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या.

मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात खटला सुरू आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महावितरणच्या भरती प्रक्रियेत SEBC उमेदवारांचा समावेश करण्याची मागणी केली होती. ऊर्जामंत्री नितीन राऊतांच्या (Nitin Raut) आदेशानुसार स्थापत्य अभियंता आणि विद्युत सहाय्यक या पदांच्या भरतीमध्ये SEBC प्रवर्गाच्या जागा राखीव ठेवण्यात येणार होत्या. सुप्रीम कोर्टाने याबाबत अंतिम निर्णय दिल्यावर SEBCच्या जागांची भरती केली जाईल, असे महावितरणाकडून स्पष्ट करण्यात आले होते. ऊर्जा विभागाच्या निर्णयावर संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी नितीन राऊत यांना पत्र पाठविले आहे.

ही बातमी पण वाचा : वीज बिलासंदर्भात पुण्यात आंदोलन; ७० लाख वीज बिल नोटिसा मागे घ्या

“SEBC वर्गातील उमेदवारांवर अन्याय होत आहे, असे प्रथमदर्शनी वाटत असल्याने उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याविषयी ऊर्जामंत्र्यांना पत्र पाठवून याबाबत खुलासा करण्याची मागणी केली.” असे संभाजीराजे म्हणाले. दरम्यान, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनीदेखील SEBCच्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत सामावून घेण्याची विनंती नितीन राऊत यांना पत्राद्वारे केली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER