भाजपची पंकजाला भेट, कट्टर समर्थकासह इतर तीन जणांना पदवीधर निवडणुकीची उमेदवारी

shirish boralkar-Pankaja Munde

मुंबई :- भाजपने राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजप केंद्रीय समितीकडून नावाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना दिवाळीची भेट म्हणून पक्षाने त्यांचे कट्टर समर्थक असलेले शिरीष बोराळकर याना औरंगाबादमधून उमेदवारी दिली आहे. तर पुण्यातून संग्राम देशमुख, नागपुरातून संदीप जोशी आणि अमरावतीतून नितीन धांडे यांना तिकीट दिले आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचे समर्थक शिरीष बोराळकर यांना तिकीट देण्यात आले आहे. पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा असल्याने समर्थकाला तिकीट देऊन त्यांची नाराजी काहीशी दूर करण्याचे पक्षातून प्रयत्न होताना दिसत आहेत. मतदार चांगल्या पद्धतीचं मतदान करतील. मागील निवडणुकीची परिस्थितीत वेगळी होती. यावेळी परिस्थिती चांगली आहे. २०१४ आणि २०२० च्या परिस्थितीत फरक आहे,अशी प्रतिक्रिया शिरीष बोराळकर यांनी तिकीट जाहीर झाल्यानंतर दिली.

नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संदीप जोशी यांनी याआधीच आपण महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यांच्यासाठी विद्यमान आमदार प्रा. अनिल सोले यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिली, त्यांचा विश्वास सार्थ ठरवेन. पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करेन. सहा महिन्यांपासून काम सुरु होते. भाजपचा गड कायम राखण्याचा प्रयत्न राहील” अशी ग्वाही संदीप जोशी यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर बोलताना दिली.

Graduate election candidacy

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER