MPSC विरोधात उमेदवार आक्रमक; रखडलेल्या नियुक्त्यांची मागणी

MPSC - Maharastra Today

पुणे :- राज्य सेवा पूर्व परीक्षा लांबणीवर टाकल्यामुळे चर्चेत आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविरुद्ध विद्यार्थी आक्रमक झालेत. MPSC ने राज्य सेवा परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल जाहीर करून आठ  महिने झाले आहेत. अद्यापही विद्यार्थ्यांना नियुक्तिपत्रे  दिली नाहीत. या विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पुण्यात शनिवारी १३ मार्च रोजी नियुक्त्या रखडलेले ४१३ उमेदवार एकत्र येणार आहेत.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र

१९ जून २०२०ला MPSC चा निकाल लागूनही उमेदवारांची नियुक्ती झाली नाही. MPSC ने ४१३ जागांसाठी परीक्षा घेतली होती. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, प्रांताधिकारी पदावर निवड होऊनही विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी संतापले आहे. MPSCने जून २०२० ला राज्य सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. यात निवड झालेल्या उमेदवारांच्या आठ महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना MPSC उमेदवारांनी पत्र लिहिले आहे. नियुक्त्या देऊन न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

परीक्षा पास होऊनही नियुक्त्या नाहीत

विद्यार्थ्यांनी दावा केला की, मुंबई उच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने राज्य सरकारला ९ डिसेंबर २०२० रोजी कोणतीही नेमणूक करू नये, असे निर्देश दिले होते. सर्वसमावेशक विचार करून तत्काळ नियुक्त्या द्याव्या, अशी विनंती उमेदवारांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER