रासायनिक खतांमुळे पंजाबमध्ये वाढतायेत कँन्सर रुग्ण.. महिला शेतकऱ्यांनी काढला तोडगा !

Cancer patients on the rise in Punjab due to chemical fertilizers .. Women farmers come up with a solution!

सध्या पंजाबचा शेतकरी दिल्लीत तळ ठोकूण आहे. नव्या कृषी कायद्याला विरोध करण्यासठी त्यांनी दिल्लीला घेरलंय. शेतीसंबंधी हे आंदोलन असलं तरी पंजाबमध्ये होणारा रासायनीक खतांचा वापर हा चिंतेचा मुद्दाय. यातूनच मार्ग काढण्याचा तेथिल महिला शेतकऱ्यांनी हा प्रयत्न केलाय.

पंजाबमध्ये हरित क्रांती झाली आणि शेतकऱ्यांनी भरपूर पैसा कमावला. नंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात तिथं रसायनांचा वापर झाला. आणि कॅन्सरचा मोठ्या (Cancer patients) प्रमाणात फैलावही. यातून मार्ग काढण्यासाठी पंजाबच्या महिला पुढे सरसावल्या.

पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यातील कोटली गावच्या रहिवासी असणाऱ्या ३५ वर्षीय करमजीत कौर. पंजाबमधील एक शेतकरी महिला. त्यांच्याकडे मोठं घर, अनेक एकर शेती, ट्रॅक्टर आणि कित्येक डझन गाई आणि म्हशीही आहेत. घरची परिस्थीती सधन असतानाही त्या घराच्या अंगणात भाजीपाला पिकवतात. त्यामागं कारणही तसंच आहे.

भाजीपाला भरपूर प्रमाणात यावा यासाठी डीएपी, युरीया आदी रासायनिक खतांचा आडमाप वापर होतो. त्यामुळे भयंकर आजारांना समोर जावं लागतंय. त्यासंबधी अनेक रिपोर्ट प्रसिद्ध होतायेत. देशाच्या तुलनेत पंजाब अशा दुर्धर आजारात अग्रेसर आहे. पंजाबच्या हरितक्रांतीमागची ही एक बाजू..

करमजीत कौर यांना ही बाब खुप लवकर लक्षात आली. त्यांनी घरातंच सेंद्रीय पद्धतीनं भाजीपाला पिकवायचा निर्णय घेतला. सुरूवातीला त्यांना हस्यास्पद ठरवलं गेलं. परंतु त्यांनी सुरू केलेला हा घरगुती उद्योग आता पंजाबमध्ये मोठा व्यवसाय म्हणून नावारूपाला आला आहे.

घराच्या छतावर भाजीपाला पिकवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या बगीच्यात भोपळी, कोथींबीर, हिरवी मिरची सोबत अर्ध्या डझनहून जास्त हंगामी भाजीपाल्याची लागवड त्यांनी केली जाते. आता हे सेद्रीय भाजीपाला उत्पादनाचा एक यशस्वी मॉडेल अनेक शेतकरी महिला त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन राबवतात. पंजाबमध्ये आता एका नव्या पर्वाला सुरूवात झाली आहे.

या बागेबद्दल विचारलं असता त्या सांगतात की, कोणतीच आई तिच्या मुलांना विष खाऊ घालणार नाही.

हरित क्रांतीच्या वाईट परिणामांचा मुकाबला आता पंजाब राज्या करतंय. पंजाबमध्ये विषारी औषध फवारणीमुळं कॅन्सर सारखा आजार आता तिथं सामान्य झालाय. प्रत्येक घरात किमान एक कॅन्सर पेशंट सापडतोच आणि दगावतोही…

पंजाबच्या गाव खेड्यातील शेत जितकी हिरवगार दिसतं तितकचं ते विषानं भरलेलं असतं. फक्त कॅन्सरचं नाही तर त्वचा रोग, किडनी रोग, यांसारखे अनेक घातक आजारांच्या पेशंट्सची संख्या तिथं दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळेच स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी पंजाबच्या महिलांनी जैविक किचन गार्डन आणि शहरात अर्बन फार्मिंगला सुरुवात केली आहे.

हरित क्रांतीने अर्थिक समस्या सोडवल्या,आरोग्याच्या समस्या वाढवल्या..

हरित क्रांतीचा थेट फायदा पंजाबला झाला. कुटुंबे अर्थिक दृष्टा संपन्न होत असतानाच काही वर्षातच तेथील लोकांना आरोग्य विषयक समस्या भेडसवायला लागल्या. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा मिशनच्या एका अहवालानूसार पंजाबमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन होणाऱ्या शेतांमध्ये सरासरीच्या तिप्पट किटकनाशकांचा वापर होतो. देशभरात प्रतिहेक्टर सरासरी ०.२९ जिथं किटकनाशक वापरली जातात तिथं पंजाब- हरियाणात ०.७५ किलो प्रतिहेक्टर इतके किटकनाशक वापरले जाते.

महिलांनी निर्धार केला आणि चित्रचं बदललं..

२००८ मध्ये बरनाला आणि फरीदपूर जिल्ह्यातील चार गावात घरगुती भाजीपाला उतपन्नाची प्रक्रिया सुरु झाली. २०२० पर्यंत ५० गावांमध्ये ही मोहीम पोहचलीये. याचा फायदा करुन घेत आरोग्याने समृद्ध झालेल्या परिवारांनी आता उत्पन्न वाढवलंय. बाजारपेठांमध्ये ही रसायनि खत विरहीत भाजीपाला विकायला सुरुवात केली. त्यामुळं या बिगरविषारी भाजीपाल्याच्या मॉडेलनं व सेंद्रीयतेच्या माऊथ पब्लिसिटीनं पंजाबच्या महिलांसाठी नव्या अर्थव्यवस्थेची दारं खुली केली आहेत.

भारतातील सर्वात सुपीक जमिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाबचं ९८ टक्के क्षेत्र सिंचनाखालीये. शेतकऱ्यांसाठी मोफत वीज आहे. मात्र पंजाबमध्ये होणाऱ्या आडमाप रासायनिक खतं आणि किटकनाशकांच्या वापरामुळं शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी अन् कॅन्सरने आजारी होत चालल्याचं दुर्दैवी चित्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER