साताऱ्याच्या राजघराण्याचे शाही सीमोल्लंघन रद्द; उदयनराजेंचा निर्णय

Udayan Raje Bhosle

सातारा : छत्रपती राजघराण्यातील शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन छत्रपती उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. दरवर्षी जलमंदिर येथून भवानी तलवारीच्या पूजनानंतर पोवई नाक्यापर्यंत भव्य शाही मिरवणूक निघते. मात्र, यंदा कोरोनाच्या साथीमुळे उदयनराजेंनी ही मिरवणूक रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस येथे परंपरागत शाही सीमोल्लंघन सोहळा साजरा होतो. या मिरवणुकीत शाही सोहळ्याला सातारकरांची मोठी गर्दी होत असते. या वर्षी भवानी मातेच्या तलवारीचे पूजन होईल. जलमंदिर पॅलेस ते पोवई नाकापर्यंत निघणारी भव्य शाही मिरवणूक मात्र रद्द करण्यात आली आहे. छत्रपतींच्या काळापासून या मिरवणुकीची परंपरा आहे.

ही परंपरा प्रथमच खंडित होत आहे. कोल्हापुरातील उद्याचा (२५ ऑक्टोबर) शाही दसरा सोहळादेखील रद्द करण्यात आला आहे. कोरोनामुळे दसरा चौकात छत्रपती घराण्याचा सीमोल्लंघन सोहळा होणार नाही. श्रीमंत शाहू छत्रपती आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत या आधीच हा निर्णय घेण्यात आला. छत्रपती घराण्याकडून साधेपणाने सीमोल्लंघन होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER