पदोन्नतीत आरक्षण रद्द; जी आरला स्थगिती

Mumbai High Court

मुंबई : राज्य सरकारच्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीत (Cancellation of promotion reservation)अडसर ठरणाऱ्या ७ मेच्या जीआरला मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High court)गुरुवारी अंतरिम स्थगिती दिली.

राज्य सरकारने याबाबतचे म्हणणे १० जूनपर्यंत सादर करावे, असा आदेश न्या. एस, जे. काथावाला आणि एस. पी. तावडे यांनी दिला.

पदोन्नतीची सर्व पदं सेवाजेष्ठतेनुसारच भरावीत, असे ७ मे च्या जीआरमध्ये म्हटले होते. या जीआरला आरक्षण बचाव कृती समितीचे विजय निरभवणे, चंद्रकांत गायकवाड व संजीव ओव्हळ यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे की, या जीआरमुळे अनुसूचित जाती – जमाती, व्हीजेएनटी व विशेष मागास प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचे आरक्षण डावलले जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button