मनपा निवडणूका रद्द करून मनपात प्रशासक नेमा कोरोनाचा धसका ; खासदार सय्यद इम्तियाज जलील

बाळासाहे ठाकरे व गोपीनाथ मुंढे यांच्या स्मारकाला आमचा विरोध ; इम्तियाज यांचा जुनाच आलाप

Imtiaz Jalil

औरंगाबाद : जगभरात कोरोनाने थैमान मांडलेला असून देशातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने केंद्र सरकारने अध्यादेश काढून देशातील सार्वजनिक ठिकाणी गर्दी होईल असे कोणतेही कार्यक्रम घेण्यात येऊ नये व त्यांना परवानगी देऊ नये असे आदेश दिले आहेत. मनपा निवडणुका काही दिवसांवर आल्याने शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर सभा, रॅली निघतील, लोकांची गर्दी होईल. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक आहे़. तसेच कोरोनाबाबत हलगर्जी पणा करून चालणार नाही. त्यामुळे मनपा निवडणुका पुढे ढकलाव्यात. तसेच मनपावर प्रशासक नेमावे, अशी मागणी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी ९ मार्च रोजी सोमवारी पत्रपरिषदेत केली. तसेच बाळासाहेब ठाकरे व गोपीनाथ मुंढे यांच्या स्मारकाला आमाचा विरोध असल्याचा जुनाच राग आलापला.

सय्यद इम्तियाज जलील म्हणाले, मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीचे रणशिंग फुंकले आहे़. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून सर्वच पक्षांनी इच्छुकांचे अर्जही मागवले आहेत. एप्रिल महिन्यात महानगरपालिका निवडणूक होणार असल्याने या धर्तीवर शहरात सर्वच पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या सभा होतील. प्रत्येक परिसरात कॉर्नर बैठका, रॅली काढल्या जातील. त्यामुळे हजारोंच्या संख्येने लोक एकत्र जमतील.

मागील महिन्याभरापासून जगभरात थैमान मांडलेल्या कोरोनामुळे केंद्रसरकारकडून खबरदारी म्हणून देशातील सर्व कार्यक्रम व सार्वजनिक सभा घेण्यास बंदी घातली़ मनपाकडूनही याबाबत पाऊले उचलली जात आहेत़. जनतेच्या जीवापेक्षा कोणीही व कोणत्याही निवडणूका मोठ्या नाहीत. जनेतचे हीत लक्षात घेवून आगामी मनपा निवडणुक पुढे ढकलण्यात यावी, शिवाय मनपाचा कार्यकाळही संपत आल्याने राज्य शासनाने तेथे प्रशासक नेमावा. प्रशासक म्हणून मनपा आयुक्त आस्तीककुमार पांडे यांची नियुक्ती करून त्यांना सर्व अधिकार द्यावेत अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली़. ते पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते. ते म्हाणाले की, नेहमी प्रमाणे रेल्वे विषयीचे प्रकरणे प्रलंबीत असल्याने व त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने मराठवाड्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सर्व पक्षीय खासदाराची एक समिती तयार करून त्यासाठी प्रयत्न करावे असे ते म्हणाले.