संसदेत गुंडगिरी करणाऱ्या खासदारांचे सदस्यत्व रद्द करा – रामदास आठवले

Ramdas Athawale

नवी दिल्ली : संसदेत गुंडगिरी करणाऱ्या खासदारांचे सदस्यत्व रद्द करा. यासाठी नवीन कायदा करा, अशी मागणी केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.

राज्यसभेत कृषी विधेयकांला विरोध करतांना विरोधकांनी उपसभापतींसमोर गोंधळ घातला होता. काही सदस्यांनी उपसभापती हरिवंशसिंह यांचा माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला होता तर काही सदस्यांनी उपसभापतींना ‘रूलबुक’ही दाखविले होते. या गुंडगिरीबाबत आठवले यांनी उल्लेखित मागणी केली आहे.

ते म्हणाले की – संसदेत सदस्यांना विरोध आणि मत प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. संयमाने मत प्रदर्शन करावे. मात्र – माईक तोडणे, बिल फाडणे, धक्काबुक्की करणे अशी गुंडगिरी करणे चूक आहे.

राज्यसभेत काल गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधी पक्षाच्या ८ खासदारांना आज राज्यसभा सभापती वैंकय्या नायडू यांनी निलंबित केले. यात डेरेक ओ ब्रायन, संजय सिंह, राजीव सातव, के के रागेश, रिपून बोरा, डोला सेना, सय्यद नाजीर हुसैन, इलामारन करीम यांचा समावेश आहे. त्यांना एक आठवड्यासाठी निलंबित केले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER