बारावीच्या परीक्षा रद्द करा; ट्विटवरून विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडं

PM Modi - Maharashtra Today

नवी दिल्ली :- देशात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने सर्वत्र थैमान घातले आहे. याचबरोबर, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवली आहे. कोरोना स्थितीचा आढावा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीत CBSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकला. संकटाची परिस्थिती लक्षात घेता, बारावीच्या विद्यार्थ्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे साकडे घातले आहे. विद्यार्थ्यांकडून सोशल मीडियावर विद्यार्थी #modiji_cancel12th boards ही मोहीम चालवत आहेत.

CBSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या गेल्या त्यावेळी १ जूनला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आणि कोरोनाची परिस्थिती पाहता बारावीचे विद्यार्थी आता ट्विटरवर सक्रिय झाले आहेत. त्यांनी ट्विटरवर #modiji_cancel12thboards ही मोहीम सुरू केली आहे. बारावीच्या काही विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षा रद्द करून निकाल जाहीर करावा, अशी भूमिका घेतली आहे.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button