गर्दीच्या ठिकाणी काही निर्बंध आणता येतील का : आयुक्त राजेश पाटील

rajesh Patil

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये काही दिवसांपासून कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. शहरात जवळपास १ हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यात चार जणांचा मृत्यू झाला. सध्या १ लाख ३ हजार १९८ जण बाधित रुग्ण आहे. यापैकी ९८ हजार २५७ जण बरे झालेत. तर मृत्यू झालेल्यांची संख्या १ हजार ८३० इतकी आहे. दरम्यान, शहरातील बंद करण्यात आलेले जम्बो कोविड आणि इतर कोविड सेंटर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू करण्याचा प्रयत्न आहे. अशी माहिती मनपा आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी दिली.

राजेश पाटील म्हणाले की, “गर्दीच्या ठिकाणी काही निर्बंध आणता येतील का? यासंबंधी काही पावले उचलली जाणार आहेत. कोरोना चाचण्या वाढवण्यात येणार. अगोदर २ हजार चाचण्या व्हायच्या, त्या वाढवून ३ हजार करणार आहे. मास्क, सॅनिटायझर नागरिकांनी वापरावे, तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.”

“कंत्राट पद्धतीवर आरोग्य कर्मचारी यांना घेण्यात आले होते. कोविड सेंटर शासनाच्या निर्देशानंतर बंद करण्यात आले. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने ते कोविड सेंटर पुन्हा ठराविक अंतराने सुरू करणार आहे. लवकरच आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा रुजू करण्याचा निर्णय घेऊ. कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. मनपा आणि राज्य प्रशासनाला कोरोनाचे सर्व नियम पाळून सहकार्य करावे. पुढील ७ दिवस नागरिकांनी सहकार्य केल्यास लॉकडाऊनची परिस्थती उद्भवणार नाही.” असा विश्वास आयुक्त पाटील यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER