गायत्री मंत्राने कोरोना बरा होऊ शकतो? संशोधन सुरू

Maharashtra Today

नवी दिल्ली :- देशात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव शिगेला पोहोचल्याने आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा जाणवत असताना केंद्रीय विज्ञान मंत्रालयाचा एक निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. केंद्रीय विज्ञान मंत्रालयाने गायत्री मंत्राने (Gayatri Mantra) कोरोना बरा होऊ शकतो का, यावर संशोधन करण्यासाठी ह्रषिकेश येथील एम्स रुग्णालयाला (AIIMS Hospital) तीन लाखांचा निधी दिला आहे.

या संशोधनासाठी कोरोनाची सामान्य लक्षणे असलेल्या २० रुग्णांची निवड होणार आहे. यातील एका गटाला नेहमीचा वैद्यकीय उपचार दिला जाणार आहे. तर दुसऱ्या गटाला नेहमीच्या उपचारांसोबत आयुर्वेदिक औषधे, गायत्री मंत्राचे पठण आणि योगासने करायला सांगितली जातील. याचा दोन्ही गटाच्या रुग्णांवर काय परिणाम झाले आहेत, हे तपासले जाईल.

रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टर्स लक्ष ठेवून असतील. साधारण दोन ते तीन महिने हे संशोधन चालेल. या काळात रुग्णांना नेहमीच्या औषधांसोबत पतंजलीचे कोरोनील हे आयुर्वेदिक औषधही देण्यात येईल, अशी माहिती डॉ. रुची दुआ यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button