खेकड्यामुळे धरण फूटू शकते का? आदित्य ठाकरे ने दिले ‘हे’ उत्तर

Aaditya Thackeray

सोलापूर : युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशिर्वाद दौ-याचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. बुधवारी ते सोलापुरला होते. तेथे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थ्याने आदित्य यांना प्रश्न केला की, खेकड्यांमुळे खरच धरण फुटू शकते का? यावर आदित्य म्हणाले, धरण अनेकदा घर्षणामुळे फुटते.

दगडावर पाण्याची लाट आदळत राहिली तर त्याचेही नुकसान होते. धरणाच्या दगडावर सतत मारा होत राहीला तर असे होऊ शकते. जिथे अक्टीविटी वाढते तिथे हे शक्य असल्याचे आदित्य म्हणाले. तसेच, खेकड्यांनी अ‍ॅक्टिविटी केल्यामुळे हे घडले असावे, असे गावक-यांना वाटलं होतं. तीवरे धरणाच्या घटनेनंतर इतर धरणाच्या ठिकाणी अशाप्रकारची अडचण झाली आहे का यावर संशोधन सुरू आहे. असे आदित्य यांनी विद्यार्थ्यांना सांगीतले.

तीवरे धरण असो वा अन्य कोणतेही, धरण कोणामुळे फुटले, का फुटले यापेक्षा त्याचे मजबुतीकरण कसे करू शकतो हे पाहिले पाहिजे. राज्यातील धरणे सुरक्षित आहेत का हे तपासले पाहिजे. धरणे कमी पडत चालली आहे ती वाचवली पाहीजे असे आदित्या ठाकरे यावेळी म्हणाले. एकूणच आदित्य ठाकरे यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना प्रसंगावधान बाळगल्याचे दिसते.

ही बातमी पण वाचा : ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमासोबत शिवसेनेचा ‘माउली संवाद’ उपक्रम उद्यापासून