डांभुर्णी ग्रामपंचायत उमेदवाराचा प्रचार सुरू आहे ऑस्ट्रेलियातून !

डांभुर्णी ग्रामपंचायत उमेदवाराचा प्रचार सुरू आहे ऑस्ट्रेलियातून !

मुंबई : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यामधील डांभुर्णी ग्रामपंचायतच्या एका सदस्याच्या प्रचारासाठी त्याच्या मित्रांनी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये प्रचार फेरी काढली! डांभुर्णी हे गाव यावल तालुक्यात आहे. १५ जानेवारीला मतदान होणार आहे.

डांभुर्णी ग्रामपंचायतच्या वॉर्ड क्रमांक २ उमेदवार शुभम गिरीश विसवे यांना विजयी करण्यासाठी ऑस्ट्रेलियातून प्रचार सुरू आहे! ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमधील त्यांच्या मित्रांनी – जनतेने उच्चशिक्षित उमेदवार शुभम विसवे यांना मतदान करुन भरगोस मतांनी विजयी करा, असे बॅनर घेऊन मेलबर्नच्या स्टेट लायब्ररीपासून फ्लिंडर्स स्ट्रीटपर्यंत प्रचार फेरी काढली. याचा व्हिडीओ पोस्ट केला. या फेरीत शुभम विसवे यांच्या भारतीय मित्रांसोबत परदेशी मित्रही सहभागी झाले होते.

याबाबत बोलताना शुभम यांचे मित्र विश्वतेज सावंत यांनी सांगितले की, “शुभम आणि माझी भेट पुण्यातील इंजिनिअरींग कॉलेजमध्ये झाली आणि गेल्या सात वर्षांपासून आम्ही चांगले मित्र आहोत. युवा पिढीचा उत्साह वाढवण्यासाठी शुभमने राजकारणात प्रवेश केला आणि पहिल्यांदाच तो ग्रामपंचायत निवडणूक लढवणार आहे. त्याच्या प्रचारासाठी आम्ही भारतात येऊ शकलो नाही म्हणून ऑस्ट्रेलियात प्रचार फेरी काढली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER