अतिजोखीम भागातून आलेल्या 50 वर्षावरील व्यक्तींच्या कोरोणा चाचणीसाठी मोहिम सुरू – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

डॉ. अभिजीत चौधरी सांगली

सांगली : अतिजोखमीच्या भागातून विशेषत: मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथून प्रवास करून आलेल्या 50 वर्षावरील व्यक्तींची कोरोणा चाचणी करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे . संबंधितांनी आपआपल्या क्षेत्रात याबबातची कार्यवाही करावी. नियमितपणे गृहभेटी देऊन तपासणी करावी. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपआपल्या क्षेत्रात गृहभेटी होतात की नाही याची खातरजमा करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

तहसिल कार्यालय शिराळा येथे कोरोनाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी शनिवारी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, 50 वर्षावरील व्यक्तींची तपासणी केल्याबाबत माहिती भरण्यासाठी गुगल फॉर्म उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यावर नियमितपणे माहिती भरावी. आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक आदि फील्डवर काम करणाऱ्या लोकांना चांगले परिपूर्ण प्रशिक्षण द्यावे. गृहभेटी होतात की नाही याची संबंधितांनी तपासणी करावी. होम क्वारंटाईन, कंटेनमेंट झोनचे उल्लंघन केल्यास त्यांना इंन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये ठेवावे. कम्युनिटी क्वारंटाईनमध्ये आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER