निवडणूक आयोगाचा प्रचारबंदीचा निर्णय अमित शहांच्या इशा-यावर : ममता बॅनर्जी

Election Commission,Amit shah,Mamta Banerjee

कोलकाता : पश्चिम बंगाल म्हणजे बिहार किंवा काश्मीर नव्हे, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, भाजपमुळे येथे आणीबाणीसारखी परिस्थिती आहे’, अमित शहांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोगाने येथे 17 मे ऐवजी 16 मे रोजीच प्रचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतल्याचा थेट आरोपही ममतांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा :- पश्चिम बंगालमध्ये 1 दिवस अगोदरच प्रचार बंद : हिंसाचाराबाबत निवडणूक आयोगाची कारवाई

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर आक्रमक होत हल्लाबोल केला. शिवाय निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईवरही त्या भडकल्या. लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील संघर्ष चिघळला आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने. प्रचार एक दिवस आधीच संपविण्याचा निर्णय घेतला.

त्या म्हणाल्या की, ‘हा सर्व कट आताचे भाजप नेते आणि माजी तृणमूल काँग्रेस नेते मुकुल रॉय यांनी रचला आहे. केंद्रीय सुरक्षा दलामुळे हिंसाचार झाला आहे. दोषींविरोधात निवडणूक आयोग कारवाई करत नाहीय. अमित शहा निवडणूक आयोगाला धमकावत आहेत. मोदींनी तर आपल्या जाहीरसभेत ईश्वर चंद्र विद्यासागर यांच्या प्रतिमेच्या झालेल्या विटंबनेबाबत निषेधही व्यक्त केला नाही’, असे सलग आरोप ममता दीदींनी पत्रकार परिषदेदरम्यान केले.

नरेंद्र मोदी बंगालच्या जनतेला घाबरू लागले आहेत. भगव्या वस्त्रात बंगालमध्ये गुंड आले आहेत. अमित शहा आणि नरेंद्र मोदी मला घाबरू लागले आहेत. अमित शहांना निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे का? भाजप बंगाल आपल्या इशाऱ्यावर चालवू शकत नाहीत, अशा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.