फाळणीनंतर भारतात आला आणि बनला बॉलिवूडचा ‘प्राण’….

Pran

बॉलिवूडमध्ये (Bollywood) भरपूर व्हिलन झाले, पण प्राणसारखा ठसा कोणीही सोडू शकला नाही. प्राण (Pran) हिट तर खूप झाला पण आपल्या मुलाला प्राणचं नाव द्यावं असं कधीच कोणत्या पालकांना वाटलं नाही.

तोच व्हीलन प्राण ज्याने बॉलिवूडला खऱ्या व्हिलनचं व्यक्तिमत्त्व कसं असतं ते दाखवलं. जेव्हा जेव्हा लोकांनी सिनेमात व्हीलनची भूमिका नाकारली तेव्हा तेव्हा त्याने हसण्यासाठी आणि हसवण्यासाठी व्हीलनची भूमिका स्वीकारली. फोटोग्राफर बनायला आले होते, पण नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं.

12 एप्रिल १९२० रोजी दिल्लीतील एका घरात प्राण कृष्ण सिकंद नावाचा मुलगा जन्माला आला. प्राणचे वडील सिव्हिल इंजिनिअर होते, त्यामुळे प्राणचं सुरुवातीचं आयुष्य आरामात गेलं.

अभिनेता बनण्याचा विचारही त्यांनी कधी केला नव्हता. त्यांना फोटोग्राफर बनायचं होतं. एका कंपनीत नोकरीही प्राण यांनी सुरु केली होती.त्यांचं फोटोग्राफीचं काम चांगलं चाललं होतं. नवनवीन ठिकाणी जाऊनअनेक गोष्टी प्राण शिकत होते. या कामाच्या संदर्भात ते एकदा शिमल्याला गेले होते. तिथे त्यांना स्थानिक पातळीवर असलेल्या रामायणाच्या कार्यक्रमाचे फोटो घ्यायचे होते. पण तिथे प्राण यांना स्टेजवर अभिनय करावा लागला…झालं असं की, शो सुरू होण्याच्या काही वेळ आधी सीतेची भूमिका करणारी व्यक्ती हजर नव्हती. थिएटरमध्ये लोकांची गर्दी जमली होती. शो रद्द करता येणं शक्य नव्हतं. त्यावेळी प्राण तिथे गेले आणि म्हणाले की ते सीतेची व्यक्तिरेखा साकारायाला तयार आहेत. त्यावेळी शोच्या दिग्दर्शकालाही दुसरा काही विचार करायला वेळ नव्हता, त्यामुळे त्याने प्राण यांना ते करूदिलं.प्राण जेव्हा सीटीईची भूमिका करायला स्टेजवर आले तेव्हा कुणीही म्हणू शकलं नाही कि ते पहिल्यांदा भूमिका करतायेत. एवढा सहज अभिनय प्राण करत होते. तेव्हापासून प्राण यांची अभिनयातली कारकीर्द सुरु झाली ती कायमचीच.

पहिलाच सिनेमा झाला होता हिट…

स्टेज शोकेल्यानंतरही प्राण यांच्या अभिनयाकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. त्यांनीही परत अभिनय करण्याचा प्रयत्न केला नाही. ते पुन्हा फोटोग्राफरम्हणून काम करू लागले. १९४० साली प्राण कामानिमित्त लाहोरला गेले होते. तिथे त्यांची भेट प्रसिद्ध लेखक मोहम्मद वलींशी झाली. ‘यमला जट्ट’ ह्या पंजाबी सिनेमासाठी ते व्हिलनच्या शोधात होते.

त्या काळात वली मोहम्मद यांच्यासोबत काम करणं ही खूप मोठी गोष्ट होती. प्राणच्या बाबतीत खुद्द वलीमोहम्मद आले आणि प्राण यांना भेटले. त्यांनी प्राणला पाहिलं होतं आणि प्राणमध्ये त्यांना त्यांचा व्हीलन दिसला होता. वली मोहम्मद यांनी प्राणसमोर सिनेमात अभिनय करण्याचा प्रस्ताव मांडला.सुरुवातीला प्राण यांना ते पटलं नाही, पण नंतर वली मोहम्मद यांनी समजावून सांगितल्यावर प्राण हा सिनेमा करण्यास तयार झाले. अशाप्रकारे प्राण यांची सिनेमाची कारकीर्द सुरु झाली, ते कामही त्यांना आवडू लागलं. १९४० साली प्रदर्शित झालेला त्यांचा ‘यमला जट’ हा चित्रपट प्रचंड हिट ठरला.आपल्या पहिल्या सिनेमातून प्राण यांनी यशाची चव चाखली. प्राण यांचं नाव लाहोरमध्ये चांगलंच प्रसिद्ध झालं. इतकंच नव्हे तर त्यांनीलाहोरमध्ये अनेक पंजाबी सिनेमेही केले.दरम्यान, १९४२ साली त्यांना ‘फॅमिली’ हा पहिला हिंदी चित्रपटही मिळाला.या सिनेमात त्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या नूरजहाँसोबत एकारोमँटिक हिरोची भूमिका साकारली होती. या सिनेमात त्यांचा अभिनय चांगला असला तरीही, रोमँटिक हिरोची भूमिका त्यांच्यासाठी अनुकूल नव्हती. त्यानंतर त्यांनी सुमारे 22 पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये कामकेलं.चित्रपटानंतर काही काळ प्राण चित्रपटांपासून दूर राहिले आणि१९४५ साली त्यांनी लग्न केलं.

वडिलांना अभिनयाची माहिती नव्हती, पण…

प्राण आपल्या वडिलांचा आदर करायचे आणि त्यांना वडिलांची थोडी भीतीहि वाटायची. आपल्या वडिलांना आपण सिनेमात काम केलेलं कधीच आवडणार नाही असं त्यांना वाटायचं.त्यामुळे सिनेमात काम करण्यासाठी ते आपल्या वडिलांपासून लपून राहिले होते.घरातल्या फक्त त्यांच्या बहिणींलाच याबद्दल माहिती होती. एकदा प्राण यांची मुलाखत वर्तमानपत्रात छापण्यात आली होती.वर्तमानपत्र त्याच्या घरी आलं तेव्हा त्याच्या बहिणींनी वर्तमानपत्रही लपवून ठेवलं होतं.

प्राण यांनी बराच वेळ हे लपवून ठेवलं असलं तरीही, प्रत्येक खोटं एक दिवस समोर येतंच. एक दिवस वडिलांना कळलंच. पण घडलं उलटं. वडील रागावले नाहीत. प्राण यांना ज्याची भीती वाटत होती ते त्यांच्याबरोबर घडलंच नाही. याउलट वडिलांनी त्यांना अभिनयात प्रोत्साहन दिलं. फाळणीमुळे झाला हा परिणाम

प्राण यांचं जीवन चांगलं चाललं होतं. सिनेमात नाव व्हायला लागलं होतं. पण हिंदुस्थानाच्या फाळणीने आयुष्य बदललं. प्राण यांना लाहोर सोडावं लागलं आणि ते मुंबईला आले.

मुंबईला आल्यानंतर बराच काळ ते सिनेमापासून दूर राहिले. मुंबईत आल्यानंतर लगेच काम मिळणं सोप्पं नव्हतं. इथे त्यांचा खरा संघरासह सुरु झाला. त्यांच्याकडचे पैसे संपत चालले होते. सुरुवातीला मुंबईत आल्यानंतर प्राण ताज हॉटेलमध्ये राहत होते. हळूहळू पैसे संपत गेले आणि काम मिळत नव्हतं. त्यामुळे त्यांना हळूहळू छोट्या हॉटेलमध्येजावं लागलं. शेवटी त्यांच्याकडे पैशांची इतकी कमतरता आली की त्यांना गेस्ट हाऊसमध्ये राहावं लागलं. मुंबईतआल्यानंतर सुमारे आठ महिन्यांनी प्राण यांना सिनेमात काम मिळालं. देवानंद यांच्याबरोबर त्यांना ‘जिद्दी’ या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली आणि इथून सुरू झालेली नवी सफर संपलीच नाही. यशाच्या शिखरावर प्राण वर आणि वरच जात राहिले.

पालकांना ‘प्राण’ या नावाची वाटायची भीती

प्राण यांनी सिनेमात पुनरागमन करताच त्यांच्या आयुष्याचं सगळंचक्रच बदललं. जिद्दी सिनेमा प्रचंड हिट झाला आणि प्राणच्या व्हिलनची भूमिका सुपरहिट ठरली. त्यानंतर सगळे दिग्दर्शक व्हिलनच्या भूमिकेसाठी प्राण यांच्याकडेच येत असत.प्राण त्या भूमिका इतक्या तळमळीने साकारत असत की ते खरोखरच व्हिलन आहेत असं त्यांचे सिनेमे बघून आजही वाटतं. अनेक सिनेमांमधल्या सुपरहिट व्यक्तिरेखांमधून त्यांचं नाव घरोघरी पोहोचलं. त्यांच्या नावाची बॉलिवूडमध्ये चर्चा झाली. पण दुसरीकडे, सर्वसामान्य लोकांना त्यांच्या नावांचीभीती वाटत असायची. प्राणच्या नावाने लोक इतके घाबरले होतेकी त्यावेळी प्राण यांचे सिनेमे बघून आपला मुलगा तसा व्हायला नको अशी सगळ्या पालकांना भीती वाटायची. प्राण हे नाव घरोघरी पोहोचलं असलं तरीही आपल्या मुलाचं नाव ‘प्राण’ कुणीही ठेवलं नाही, ही एक गमतीशीर बाब आहे.

‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ मृत्यूच्या काही काळापूर्वी मिळाला…

बराच काळ प्राणने चित्रपटांमध्ये व्हीलनची भूमिका साकारली होती. ते आतात्यांचं वैशिष्ट्य बनलं होतं. पण प्राण यांना सर्व प्रकारच्या अभिनयाचा अनुभव घ्यायचाहोता. त्यामुळे त्यांनी व्हिलनच्या व्यक्तिरेखा साकारणं बंद केलं.१९६० साली मनोजकुमारच्या उपकार चित्रपटात प्राण यांना चांगला रोल मिळाला. त्यानंतर त्यांनी आपला अभिनय सकारात्मक भूमिकेत दाखवला. काही काळ प्राण यांनी अशाच सिनेमांमध्ये काम केलं, पण नंतर त्यांच्या वयामुळे त्यांना स्वतःला अभिनयापासून दूर करावं लागलं.प्राण यांनात्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले, पण दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणे हे त्यांचे खरे यशहोते. १२ जुलै २०१३ला हिंदी सिनेमासृष्टीतल्या या सच्चा कलाकाराने अखेरचा श्वास घेतला. प्राण कालहि हिट होते आणि आजही हिट आहेत. त्यांचे सिनेमे आवडणारा वेगळा वर्ग नाही. प्रत्येकाला आवडावं असं त्यांचं काम होतं. आज प्राण आपल्यात नसले तरीही ते कायम सोबत आहेत त्यांच्या अजरामर सिनेमातुन !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER