राष्ट्रवादीला भित्रा पक्ष म्हणत निलेश राणेंनी शिवसेनेच्या हिमतीला दिली दाद

Nilesh Rane-Sharad Pawar-CM Thackeray

मुंबई :- कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या साखर उद्योगाला पुन्हा सावरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून विशेष पॅकेज देण्याची विनंती केली होती. त्यांच्या या एका पत्रावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आणि भाजपाचे नेते निलेश राणे यांच्यात ट्विटर वॉर सुरू झाले आहे. ट्विटरच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. त्यातच आज पुन्हा निलेश राणे यांनी ट्विट करत चक्क शिवसेनेच्या हिमतीला दाद देत राष्ट्रवादीला लक्ष केले आहे.

निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, आमचा शिवसेनेशी अनेक वर्षांचा संघर्ष आहे. तसेच आम्ही एकमेकांना अनेक वेळा अपशब्ददेखील वापरला. पण आम्ही दोघांनी लढाई मैदानाची ठेवली. कधी तिसऱ्याला आमच्या लढाईत खेचले नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका कपटी आणि भित्रा निघाला की त्याने लगेच पळ काढला, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. तसेच स्वत: लढू शकत नसेल तर मैदानातही यायचंच नाही, असा टोलादेखील निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लगावला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

Web Title : Calling the ncp a cowardly party nilesh rane praised the shiv senas support

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)