कोश्यारी यांना परत बोलवा, शिवसेनेची केंद्राकडे मागणी

Uddhav & Khosyari

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) राज्यातील भाजपाच्या मर्जीनुसार कारभार चालवतात, असा आरोप शिवसेनेने शनिवारी केला व भगतसिंग कोश्यारी यांना परत बोलावून घ्या, अशी मागणी केंद्राकडे केली.

शिवसेनेने म्हटले आहे की, राज्यातील सरकार संविधानिक कायद्यांनुसार चालावे, असे केंद्र सरकारला वाटत असेल तर भगतसिंग कोश्यारी यांना परत बोलावून घ्यावे. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थिर व मजबूत आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करण्यासाठी राज्यपालांच्या खांद्याचा वापर करू शकत नाही.

शिवसेनेने आपल्या ‘सामना’च्या संपादकीयातून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर भाष्य केले. भगतसिंह कोश्यारी गेली अनेक वर्षे राजकारणात आहेत. केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री देखील होते. पण, महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून ते नेहमीच काही ना काही कारणांवरून वादाच्या भोवऱ्यात असतात.

अलीकडेच सरकारी विमानाच्या प्रवासावरून भगतसिंग कोश्यारी चर्चेत आले आहेत. राज्यपालांना सरकारी विमानाने देहरादूनला जायचे होते, परंतु राज्य सरकारने सरकारी विमानासाठी परवानगी दिली नाही. त्यानंतर ते खाजगी विमानाने देहरादूनला गेले. यावरुन राज्यातील राज्यपाल आणि सरकार यांच्यातील वाद सुरू आहे.

शिवसेनेने म्हटले आहे की, राज्यपालांचा हा वैयक्तिक दौरा होता आणि कायद्यानुसार राज्यपालच नव्हे, तर मुख्यमंत्री देखील वैयक्तिक कारणांसाठी सरकारी विमानांचा वापर करू शकत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने कायद्याच्या चौकटीत राहून काम केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER