ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही : उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray - OBC Reservation

मुंबई : ज्यातील ओबीसींच्या आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लावणार नाही, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळाला दिले. तसेच या समाजाचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

ओबीसी समाजाच्या (OBC Community) वतीने भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळांच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह प्रभारी मुख्य सचिव सीताराम कुंटे, माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि ओबीसी समाजाचे, बारा बलुतेदार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. मराठा समाजाच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती आहे. आता त्याच धर्तीवर ओबीसी समाजासाठीही मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचे आश्वाासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी या शिष्टमंडळाला दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER