मंत्रिमंडळाची डागडुगी : अधिकाऱ्यांच्या बदल्यांसोबत बदलणार मंत्र्यांची खाती

Uddhav Thackeray

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सरकारला रोज गंभीर आरोपांचे धक्के बसत आहेत. भाजपाच्या (BJP) टीकेने आघाडीतील मुख्यत्वे शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीला फटके बसत आहेत. यावर उपाय म्हणून अधिकाऱ्यांच्या बदल्यांसोबत पुढील आठवड्यात काही मंत्र्यांची खातीही बदलण्याची शक्यता आहे.

भाजपाच्या आरोपांनंतर वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. आता थेट गृहमंत्री अनिल देशमुख आरोपांच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सव्वा वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्यावेळी राज्यात आधीच्या भाजपा सरकारने नियुक्त केलेले IAS आणि IPS अधिकारी पदावर होते. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उचलबांगडी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण तसे झाले नाही. त्यामुळे सत्ता महाविकास आघाडीची असली तर प्रशासकिय अधिकारी मात्र भाजपाने नियुक्त केलेलेच होते. त्याची झळ आता महाविकास आघाडीला बसू लागली आहे, अशी सरकारी गोटात चर्चा आहे.

महाविकास आघीडीतील मंत्र्यांवर भाजपाचे नेते गंभीर आरोप करत आहेत. त्या सर्व आरोपांची माहिती देणारे सूत्र हे वरिष्ठ अधिकारीच आहेत, असा सत्ताधारी महाविकास आघीडीतील नेत्यांचा आरोप आहे. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागातील खडानखडा माहिती गृहमंत्र्यांच्या आधीच मिळवली होती. त्यांनी सभागृहात CDR आणि मनसुख हिरण मृत्यू प्रकरण संदर्भातील माहिती जाहीर करून गृहमंत्र्यांना कोंडित पकडले होते. गृहविभागावर पकड असणारा मंत्री हवा असे शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठरवल्याची माहिती आहे. त्यामुळेच पुढच्या आठवड्यात राज्य मंत्री मंडळात महत्वाचे फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या मंत्रिमंडळ फेरबदलात कुणाचा पत्ता कट होतो आणि कुणाला मंत्रीमंडळात संधी मिळते याकडे नेत्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER