उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची बैठक ; मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता

CM Uddhav Thackeray

मुंबई :- राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीमध्ये राज्यातील लॉकडाऊन (Lockdown)आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

राज्यात लागू असलेल्या निर्बंधांमध्येही किराणा दुकाने पूर्ण वेळ सुरू होती. त्याची वेळ कमी करत सकाळी सात ते अकरा अशी वेळ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इतर अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या वेगवेगळ्या यंत्रणा सुद्धा कमी करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती समोर येत आहे.

मागील सात ते आठ दिवसांपासून कडक निर्बंध लादण्यात आले असले तरीही त्याचा फारसा फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अधिक कठोर निर्णय घेतले तर कदाचित रुग्ण संख्या कमी होण्याची शक्यता आहे. यामुळेच राज्य मंत्रिमंडळामध्ये यावर आज विचारमंथन होईल, अशी माहिती समोर आली आहे.

ही बातमी पण वाचा : पंतप्रधान मोदींना आनंदाची बातमी समजली असेलच ; शिवसेनेची टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button