मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य – नितीन राऊत

nitin Raut

मुंबई : नोकर भरतीला मान्यता देण्याची माझी मागणी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आली, अशी माहितीत ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिली.

ते पत्रकारांना माहिती देतांना म्हणालेत, नोकर भरतीबाबत मी देखील मागणी केली आहे. ज्याप्रकारे गृहखात्याने नोकर भरतीचे परिपत्रक काढले त्याचप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक काढावे आणि नोकरभरती करावी, अशी मी विनंती केली आहे. ही विनंती मान्य झाली आहे. त्याचबरोबर पदोन्नतीबाबतही मी आवाज उठवला, त्यालाही मान्यता मिळाली.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) म्हणालेत, नोकर भरती आणि त्या संबंधित विषयांवर आज बैठकीत चर्चा झाली. मराठा आरक्षणाचा विषय न्यायालयात असल्याने त्यावर नीट मार्ग काढला जाईल.

नोकर भरतीसाठी नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र, नोकरभरतीबाबत सरकार घोषणा करण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्व काँग्रेस (Congress) नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्राद्वारे नोकर भरतीची प्रक्रिया सुरु करण्याची विनंती केली होती.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

• कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यासाठी कापूस पणन महासंघाला बँकाकडून कर्ज घेण्यास १५०० कोटीची शासन हमी

• राज्यात शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा निर्णय

• खासगी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास मान्यता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER