ठाकरे सरकारमध्ये बिनखात्याचे कॅबीनेट!

uddhav thackeray govt

मुंबई : तुम्ही किती संघर्ष करता कसे पास होता यापेक्षा पास झाल्यानंतर मात्र, पुञढे आलेल्या सर्व आव्हानांचा सामना करणं तुम्हाला भाग असतं. असंच चित्र सध्या राजकीय राजकारणाचे आहे. मोठ्या संघर्षानंतर शिवसेनेनं आपला मुख्यमंत्री बसवला आहे. परंतु संघर्षाने मिळवलेल्या या खुर्चीला अनेक आव्हानांचा सामना करायचा आहे. 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्री आणि त्यांच्या 6 मंत्र्यांनी शपथ घेतली मात्र, उद्धव सरकारमध्ये अद्याप खातेवाटपावर पेच सुरू असल्याचे समजत आहे.

रवीवारी विधानसभा अध्यक्षपदी कॉंग्रेसचे आमदार नानाभाऊ पटोले यांची बिनविरोध निवड झाली. विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. महिनाभर सुरू असलेला सत्तेचा गोंधळ आता थांबला आहे. त्यामुळे आता उत्सिकता आहे खातेवाटपाची. तसंच ठाकरे सरकारमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री कोण असतील यावरही अद्याप ठरले नाहीये.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून खातेवाटप मुहूर्ताची घोषणा

महाविकास आघाडीत काही मोजक्या मंत्र्यांचा शपथविधी झाला असला तरीही अद्यापही या मंत्र्यांना कोणतंही खातं देण्यात आलं नाही. अजून खातेवाटपाबाबत वाटाघाटी सुरू असल्याची स्थिती महाविकासआघाडीत आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून राज्यात काहीच आलबेल नसल्याचं आपण पाहीलं आहे. लोकांचा कौल ज्या भाजप शिवसेना युतीला होता. मात्र, शिवसेनेनं ऐनवेळी आपली बार्गंनिंग पॉवर वाढवली आणि टोकाचा निर्णय घेऊन भाजपसोबतची तीस वर्षांची युती एका झटक्यात तोडली. त्यानंतर आजवरचे विरोधक असलेले कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने सत्ता स्थापन केली आहे. विरूद्ध विचारसरणी. एकापेक्षा एक दिग्गज अनुभवी नेते. त्या तुलनेत पदांची संख्या कमी त्यामुळे कमाईच्ा तुलनेत खाणारी तोंडचं अधिक अशी स्थिती महाराष्ट्र विकास आघाडीत अ,सल्याचे दिसते. म्हणूनच कदाचित उपमुख्यमंत्री आणि खातेवाटप यासाठी या आघाडीला विलंब लागत असल्याचे बोलले जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर शिवतीर्थावर संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याच दिवशी शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र आज 2 डिसेंबर तारीख उलटून देखील कॅबिनेट पदाची शपथ घेतलेले मंत्री कोणत्या खात्याचा कारभार पाहणार हे स्पष्ट झाले नाही.

खातेवाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये मतमतांतर असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकच नाही तर उपमुख्यमंत्रिपदाबाबतही अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. जयंत पाटील आणि अजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदाच्या नावासाठी चर्चा आहे. मात्र अद्यापही कोणाच्याही नावावर उपमुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आला नाही. एकूणच खातेवाटपला होत असलेल्या विलंबामुळे बिन खात्याचे कॅबिनेट मंत्री अशीच आमदारांची अवस्था झाली आहे.