चॕनल सेव्हनचा आरोप, क्रिकेट आॕस्ट्रेलिया बीसीसीआयला घाबरते

CA terrified of BCCI- Channel Seven

आॕस्ट्रेलियातील सुप्रसिध्द टेलिव्हिजन वाहिनी ‘चॕनल सेव्हन’ने (Channel Seven) आरोप केलाय की क्रिकेट आॕस्ट्रेलिया (CA) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) दडपणाखाली आहे आणि बीसीसीआय व चॕनल सेव्हनची स्पर्धक वाहिनी फॉक्सटेलच्या मर्जीनुसार निर्णय घेत आहे, त्यामुळे या तिघांदरम्यानच्या पत्रव्यवहाराची माहिती आपल्याला मिळावी यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

चॕनेल सेव्हन ही मोफत वाहिनी असून त्यांच्याकडे फाॕक्सटेलसोबत अॉ स्ट्रेलियाच्या कसोटी सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क आहेत तर फॉक्सटेल या सशुल्क वाहिनीकडे आॕस्ट्रेलिया व भारतादरम्यानच्या मर्यादीत षटकांच्या सामन्यांचे हक्क आहेत. सिडनी मॉर्निंग हेरॉल्डने दिलेल्या वृत्तानुसार क्रिकेट आॕस्ट्रेलियाने सामन्यांच्या कार्यक्रमात बदल करुन त्यांच्याशी केलेल्या कराराचा भंग केला आहे म्हणून त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

त्यांचे मुख्याधिकारी जेम्स वारबर्टन यांच्या म्हणण्यानुसार ‘सीए’ ने यंदाच्या मोसमाची सुरुवात भाराताविरुध्दच्या अॕडिलेड येथील दिवस-रात्र कसोटी सामन्याने करणे अपेक्षित होते पण त्यांनी तसे न करता आधी वन डे आणि टी-20 सामन्यांची मालिका आयोजित केली आहे. हे बदल करताना सीए’ने आपले डोके वापरलेले नाही. त्यांना प्रक्षेपकांचीही किंमत नाही आणि बीसीसीआयला घाबरुन ते असे निर्णय घेत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.

चॕनल सेव्हनचा सीए’ सोबत 450 दशलक्ष डॉलरचा करार आहे आणि हा दावा जर सेव्हनने जिंकला तर त्यांना भरपाईपोटी फार मोठी रक्कम मिळू शकतै किंवा तीन वर्षांचा त्यांचा करार मध्येच संपू शकतो.

या आॕस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या सामन्यानंतर मायदेशी परतणार असल्याचाही सेव्हनला मोठा फटका बसणार आहे कारण या मालिकेत विराट कोहाली हाच सर्वात मोठे आकर्षण आहे. त्याच्या न खेळण्याने प्रेक्षक संख्या घटण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER